वाघाडी : शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथे तिळवण तेली पंच मंडळ संस्था यांच्यावतीने संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने, समाजसेवक, समाजभूषण, नवनिर्वाचित पदाधिकारी, देणगीदार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. समाजातील सामाजिक, राजकिय व विविध श्रेत्रातील कार्यात अग्रसेर असलेले भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र तैलिक महासभा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा जिवन गौरव पुरस्कार देवुन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन वाघाडी तिळवण तेली पंच मंडळ अध्यक्ष अशोक छगन चौधरी, उपाध्यक्ष भरत चौधरी, सचिव काशिनाथ चौधरी, संचालक भगवान चौधरी, रमेश चौधरी, गुलाबराव चौधरी, दीपक चौधरी, गजानन चौधरी, मुरलीधर चौधरी, सल्लागार अशोक नाटू चौधरी, भगवान चौधरी तसेच वाघाडी येथील तेली समाजाने केले होते.
