मुकटी ग्रा. प.निवडणुकीत युवक काँग्रेसचे हर्षल साळुंखे यांच्या विजयाची सर्वत्र चर्चा* चार वेळा निवडून आलेल्या भाजप पॅनल प्रमुखांचा केला पराभव......

 

धुळे- नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मुकटी (ता.धुळे) येथे युवक काँग्रेसचे पदाधिकारी हर्षल साळुंखे यांनी तब्बल चार वेळा निवडून आलेल्या भाजपच्या पॅनल प्रमुखाचाच पराभव केला. त्यामुळे हर्षल साळुंखे यांच्या विजयाची तालुक्यात चर्चा आहे.

महाराष्ट्रासह धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले, विविध पक्ष दावे-प्रतिदावे करू लागले. मात्र या निवडणुकीत काही लढती लक्षवेधी ठरल्या. त्यात मुकटी ता. धुळे या ग्रामपंचायत निवडणुकीत तिरंगी लढत झाली. त्यात भाजपच्या पॅनलचा दारूण पराभव झाला. मात्र या सर्वांमध्ये धुळे जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष हर्षल साहेबराव साळुंखे यांनी दिलेली लढत रंगतदार ठरली. त्यांनी धुळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि मुकटी ग्रामपंचायत निवडणुकीत तब्बल चार वेळा निवडून आलेले भाजपाचे पॅनल प्रमुख श्री रोहिदास गंगाराम साळुंखे यांचा पराभव करीत ऐतिहासिक विजय मिळविला. त्यामुळे भाजपची लाट कायम म्हणणाऱ्यांची या ठिकाणी नामुष्की झाली. हर्षल साळुंखे हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांचे समर्थक आहेत. ते धुळे तालुका आणि धुळे जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते. त्यांनी युवक काँग्रेसच्या चळवळीतून राजकारणात प्रवेश करीत सामाजिक व राजकीय कार्यास सुरुवात केली आहे. गावातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक व विकासाच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्न करीत असतात. त्यांच्या या कामाची दखल घेत जनतेने 

सहा वेळा निवडून आलेल्या  भाजप पदाधिकाऱ्याचा पराभव करीत हर्षल साळुंखे यांना  विजयी केले. जिल्ह्यात हर्षल साळुंखे यांची लढत लक्षवेधी व रंगत ठरली होती. त्यामुळे गावासह परिसरातील जनतेचे त्यांच्या या लढतीकडे लक्ष होते. त्यांच्या विजयाची सर्वत्र चर्चा सुरू असून विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. दरम्यान जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवित गावातील सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी व तरुणांना सोबत घेऊन विकासासाठी प्रयत्न करू, तसेच जनतेचे वैयक्तिक प्रश्न सोडवण्यासाठी रात्रंदिवस कार्य करण्याची हमी हर्षल साळुंखे यांनी दिली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने