हिसाळे गावात श्री गुरु गोरक्षनाथ पॅनलच्या दणदणीत विजय

  


शिरपूर तालुक्यातील पुर्व पट्टय़ात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत हिसाळे गावातील निकालावर परिसरातील गावाची नजर होती. कारण हिसाळे गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चार पॅनल उतरलेले होते अशा या चुरशीच्या लढतीत  माजी पं.स.सभापती श्री.संजय संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री.विकास गुलाबराव पाटील यांनी उभे केलेल्या श्री गुरू गोरक्षनाथ ग्रामविकास पॅनलला पसंती देत गावातील मतदारांनी दणदणीत विजय मिळवून दिला असुन श्री गुरू गोरक्षनाथ ग्रामविकास पॅनलचे लोकनियुक्त सरपंच पदासाठी श्री.उत्तम मला पावरा हे निवडून आले असुन इतर सहा जागांवरही श्री गुरू गोरक्षनाथ ग्रामविकास पॅनलला विजय मिळाला आहे.तसेच श्री बुधा मला पावरा यांना पाच जागांवर विजय मिळाला असून विद्यमान लोकनियुक्त सरपंच सौ.वर्षा रामेश्वर पाटील यांना एकही जागा मिळवता आली नाही व स्वतःच्या वॉर्डात विद्यमान सरपंचाना पराभव पत्करावा लागला आहे.तरी गुरू गोरक्षनाथ ग्रामविकास पॅनलचे मा.अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम दादा व जि.प.अध्यक्ष तुषारभाऊ रंधे यांनी अभिनंदन केले आहे व पुढिल वाटचालीबाबत शुभेच्छा दिल्यात..

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने