भाजपाच्या माजी नगरसेविका, यांच्या घरी चार लाखाची धाडसी चोरी....* *भरवस्तीतील राणीपुरा गल्लीमधील घटना....* *चोरीच्या घटनेत सोन्याचे दागिने व रोख दोन लाख रूपयांचा समावेश...* प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे मालपूर.

 



*दोंडाईचा-* येथील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका यांच्या भर वस्तीतील राणीपुऱ्यामधील राहत्या घरी घरात कोणी नसल्याची संधी साधुन चोरट्यांनी चार लाखाच्या आत साहित्य चोरून धाडसी चोरी केली आहे. त्यामुळे गल्लीतील इतर रहिवाशांच्या मनात आपल्या जान-माल संदर्भात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


याबाबत दोंडाईचा पोलीस ठाण्यात १९ डिसेंबर सोमवार रोजी भाजपाच्या माजी नगरसेविका श्रीमती मंगलाबाई नानाभाऊ धनगर -५२ वर्षे रा . राणीपुरा धनगर गल्ली दोंडाईचा यांनी समक्ष पोलीस स्टेशन येथे हजर राहुन फिर्याद लिहून दिली की, मी वरील ठिकाणी मी तसेच मुलगा सुर्यदीप नाना धनगर व सुन अश्विनी सुर्यदीप धनगर असे एकत्र परीवारात राहत असुन माझा मुलगा सुर्यदीप हा दोंडाईचा येथे नगरपरीषद मध्ये शिपाई म्हणुन नोकरीस आहे.


दिनांक १७ डिसेंबर शनिवार रोजी दुपारी ०४.०० वाजेच्या सुमारास मी व माझा मुलगा,सुन असे सगळेजण घोटाणे ता.जि.नंदुरबार या गावी माझ्या भावाच्या घरी भेटण्यासाठी गेलो होतो. तेथे गेल्यानंतर आम्ही घोटाणे येथे भावाच्या घरीच मुकामी थांबलो होतो.दिनांक १९ डिसेंबर सोमवार रोजी दुपारी ०२.०० वाजेच्या सुमारास दोंडाईचा येथे आमच्या घरासमोर राहणारे माझ्या लहान बहीणीचे पती अनिल भिला धनगर यांनी फोनव्दारे माझा मुलगा सुर्यदिप यांस कळविले की, मी आज तुमच्या घराचा दरवाजा पाहीला असता त्या दरवाजाचा कुलुप तोडुन खाली पडलेले दिसत आहे. कदाचीत तुमच्या घरात चोरी झालेली असावी,असे कळविल्याणे मी व माझा मुलगा सुन असे लागलीच दोंडाईचा येथे आमच्या घरी येउन पाहिले असता. आमच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलुप कोणीतरी अज्ञाताने तोडुन ते खाली दरवाजा जवळ जमीनीवर पडले होते. त्या नंतर आम्ही आमच्या घरात आत प्रवेश करुन पाहणी केली असता, आमच्या घरातील पहिल्या हॉल मधील कपाटे उघडे दिसले व त्या मधील फाइल व इतर सामानाची नासधुस केलेली निदर्शनास आली. तसेच बेडरुमच्या आत मध्ये आत जावुन पाहीले असता, बेडरुम मधील कपाटमध्ये असलेल्या सामान अस्थावेस्त पडलेले दिसले. तसेच बेडरूम मधील लोंखडी कपाट तोडुन त्या मधील सामान देखील अस्थावेस्त पडलेला दिसला.आम्ही खात्री केली असता माझ्या घरातुन खालील वर्णनाचे व किंमतीचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम चोरीस गेले असुन ते खालील प्रमाणे ६) २००००/ - रुपये किंमतीचे १ तोळे वजनाचे सोन्याचे टोगल जु.वा.

 ७) ७००००/ - रुपये किंमतीची ३.५ तोळे वजनाची एक सोन्याची मंगलपोत जु.वा. समक्ष

 ८) १४०००/- रुपये किंमतीचे ७ गॅम वजनाचे सोन्याचे टोगल जु.वा.

 ९) १४०००- रुपये किंमतीचे ७ गॅम वजनाचे सोन्याचे काप जु.वा. १०) ४००००/- रुपये किंमतीचे २ तोळे वजनाची सोन्याची चेन जु.वा. ११) २१७०००/- रुपये रोख त्यात ५००/,१००/ दराच्या चलनी नोटा,असे एकूण ३,७५०००/ येणे प्रमाणे वरील वर्णनाचे व किंमतीच सोन्याचे दागिणे तसेच रोख रक्कम माझ्या घराच्या दरवाजाचे कुलुप तोडुन कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेले आहेत. तरी दिनांक १७ डिसेंबर शनिवार रोजी दुपारी ०४.०० वाजता ते दिनांक १९ डिसेंबर सोमवार रोजी दुपारी ०२.०० वाजेच्या दरम्यान दोंडाईचा शहरातील राणीपुरा धनगर गल्ली दोंडाईचा ता.शिंदखेडा जिल्हा धुळे येथील माझ्या बंद घराचे दरवाजाचे कुलुप तोडुन घराच्या आत अनिधिक्रुतपणे प्रवेश करुन घरातील बेडरुम मधील लोंखडी कपाट कोणीतरी अज्ञात इसमाने तोडुन माझ्या घरातील वर नमुद वर्णनाचे व किंमतीचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम माझ्या सहमंतीशिवाय चोरुन नेले आहे . म्हणुन माझी अज्ञात इसमा विरुद फिर्याद आहे,असे तक्रारीत म्हटले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने