शिरपुर— दिनाक 21/12/2022 रोजी शिरपुर वरवाडे नगर परिषद क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वरवाडे
न.प.शाळा क्र.९ च्या प्रांगणात क्रीडामहोत्सव (Sport-Day)चा कार्यक्रम
उत्साह वातावरणात झाला.सदर आयोजन शिरपुर वरवाडे नगर परिषद संचलीत क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले न.प.शाळा क्र.९,सगुनाबेन चंपकलाल वैद्य प्री-प्रायमरी
स्कूल आणि न.प.शाळा क्र.६ वरवाडे शिरपूर यांनी संयुक्तरीत्या केले.या
कार्यक्रमामध्ये सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायती सादर
केल्या तसेच विविध वैयक्तिक खेळ जोश पूर्ण वातावरणात सादर केले त्या मधील
विजेत्यांना ऑलम्पिकच्या धर्तीवर मेडल देऊन गौरविण्यात आले. सदर
कार्यक्रमासाठी मा.राजेंद्र जगदीश अग्रवाल (सभापती शि.व.न.प. शिक्षण मंडळ शिरपूर ) यांनी अध्यक्षस्थान भूषविले तसेच क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन केले.मा.तुषारजी नेरकर सर (प्रशासन अधीकारी तथा उप.मुख्याधिकारी शि.व.न.प. शिरपूर ) उपस्थित होते.
मा.शे.खतिब् शे.अजीज , मा.सिद्दीक तेली सर, मा. सुरेश चौधरी सर ,मा.किशोर बाबुराव पाटील सर,मा.चंद्रकांत माळी सर व मा.देविदास माळी ,मा.हिरालाल मराठे सर, शिक्षण मंडळ प्रमुख मोहन चौधरी सर,मा.संतोष महारू माळी सामाजिक कार्यकर्ता, मा.संतोष चिंतामण माळी ,
, मा. सौ. वंदना रघुवंशी मॅ. , मा. सौ. मा म्.चौधरी मॅ..सलमाबी मॅ. मा.सौ.जयश्री चव्हाण मॅ. , निलोफर मॅ. हे मान्यवरउपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा.मुख्या. संध्या माळी ,मा..उपमुख्या. पल्लवी राजपूत यांनी मार्गदर्शन
केले.तिन्ही शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनिंनी त्यांना अनमोल सहकार्य
केले .सुत्रसंचालन श्री पावरा सरांनी केले.
