पांडु बापु माळी यु. हायस्कूलच्या वतीने पो. नि. आगरकर साो, यांचा सत्कार व निवेदन मेन रोड चा श्वास मोकळा केल्याबद्दल आभार व्यक्त




शिरपूर पोलिस स्टेशन नव्याने रुजू झालेले पोलिस निरिक्षक ए. एस. आगरकर साो, यांच्या सत्कार शहरातील पां.बा.मा. युनिसिपल हायस्कूलच्या मुख्याध्यापक व विद्यार्थिनी व शिक्षिका यांच्यामार्फत करण्यात आला.

सोबत शहरातील वाहतूक व्यवस्था व टवाळांचे बंदोबस्त होणे बाबत निवेदन दिले असून शहरातील अडथळे अतिक्रमण हटविणे कामी व शहरातील मेन रोडवरील रहदारीचा अडथळा दूर करून शालेय विद्यार्थ्यांना ज्यांना येण्यास होणारा त्रास मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे आणि  जे उल्लेखनिय कार्य हाती घेतलेले ते पोलिस निरीक्षक आगरकर व त्यांचे सहकारी प्रविण गोसावी, लादूराम चौधरी, मुन्ना पवार, अण्णा आखडमल, मुकेश पावरा, स्वप्निल बांगर, अमित रणमाळे, गोविंद कोळी, ललित पाटिल, वाहुतकचे गणेश मुसगे यांचा देखील उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल विद्यार्थीनी सत्कार करण्यात आला असून शालेय विद्यार्थ्यांकडून पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले.

 पोलिस निरिक्षक आगरकर यांनी मुख्याध्यापक ए. एस. कानडे सर परिवेक्षक सौ.जे. दास, सोनवणे, वर्गशिक्षिका कुंवर मॅडम व विद्यार्थीनी समोर ग्वाही देत मी प्रत्येक शाळेला भेट देणार व तुमच्या समस्यांचे जलद गतीने निश्चितच निवारण होणार अशी ग्वाही दिली आहे.



गेल्या आठवड्यापासून शिरपूर पोलीस कर्मचारी व रस्ता वरील अडथळे (अतिक्रमण दूर करून उल्लेखनिय कामगिरी बजावत आहे.. त्यामुळे शिरपूर बस स्टैंड ते थेट कॉलेज पर्यंत असते. अडथळेतून आम्ही विद्यार्थिनी महिला, जेष्ठ नागरिक त्यातून मार्ग काढावा लागत होता व अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागत होते हि बाब आपण लक्षात घेऊन एक मोठी जबाबदारी व उल्लेखनीय कार्य घेतले या बदल आपले मनस्वी आभार व असेच सातत्य कायम टिकवून ठेवावे हि नम्र विनंती. तसेच प्रत्येक शाळा, कॉलेज, क्लासेस जवळ शाळा भरताना व सुटतांना अनेक मोटरसायकल स्वार टवाळ मुलांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे आम्ही विद्यार्थीनी त्रस्त आहोत. तरी महिला पोलिस कर्मचारी व अधिकारी यांनी या सडक छाप विनापरवानेचे मोटार सायकल स्वार व टवाळ यांचा बंदोबस्त व्हावा असे निवेदन विद्यार्थीनी भाविका पाटील, स्नेहल देवकर, योगिता बोरसे, स्नेहा बोरसे, रेणूका बारी, भुमिका भार्गव, पूर्वा मराठे सह मुख्याध्यापक ऐ. एस. कानडे, पर्यवेक्षिक सौ. सोनवणे, वर्गशिक्षिका कुंवर यांनी दिले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने