रेशन मालाच्या चोरी संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मुख्य सूत्रधार अजूनही पडद्यामागेच शिरपूर महेंद्रसिंह राजपूत



शिरपूर तालुक्यातील रेशन मालाची चोरी करून मध्य प्रदेशात विक्री होत असल्याबाबतची शंका व्यक्त करत एका संशयित वाहनास तालुक्यातील मलकातर ग्रामस्थांनी रंगेहात पकडले होते. व त्या क्षणी काहींनी त्याचे चित्रीकरण देखील केलेले होते. सदरच्या सर्व गैरप्रकार जागृत नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केला होता. स्थानिक वृत्तपत्रांनी देखील सदरच्या बातम्या प्रकाशित केल्या होत्या.याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांकडून देखील मा. उपविभागीय अधिकारी शिरपूर व मा. तहसीलदार शिरपूर यांच्याकडे लेखी तक्रारी देखील सादर करण्यात आल्या होत्या.

या प्रकरणाची शिरपूर महसूल प्रशासनाने व तहसीलदार शिरपूर यांनी तात्काळ दखल घेतली असून वायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे व वरिष्ठानकडून मिळालेल्या पत्र व मार्गदर्शनानुसार तहसीलदार सो यांनी पुरवठा निरीक्षक प्राजक्ता बाबाराव सोमवलकर यांना या प्रकरणात फिर्याद देण्याचे आदेश दिल्यानंतर दिनांक 6 डिसेंबर रोजी या प्रकरणात शासनाकडून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदरच्या फिर्यादीमध्ये संशयित माल ट्रक क्रमांक mh १८ बी झेड ५६१३ उभी असून त्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या गोण्यांमध्ये माल भरलेला दिसून येत आहे, त्या त्या ट्रकच्या आजूबाजूला गावातील काही नागरिक व बाहेरून आलेले संशयित इसम दिसत असून त्या परिसरात पांढऱ्या रंगाची मारुती सियाज क्रमांक mh १८ BC १९२० हि कार उभी दिसत आहे. शिवाय या व्हिडिओमध्ये नागरिकांना मागील चार महिन्यांपासून रेशनचे धान्य मिळालेले नाही असे संभाषणाच्या आवाज येत आहे. व त्याखाली दिनांक २ डिसेंबर रोजी सकाळी ६ वा. एक १२ टायरची माल ट्रक मध्ये ३० टन तांदूळ भरला आहे व सदर गाडीवरील ड्रायव्हर यांना नागरिकांनी विचारपूस केले असता त्याने गाडीमध्ये भरलेला माल हा मध्य प्रदेश मध्ये घेऊन जात आहे वगैरेच्या मेसेज टाकला आहे. यावरून मा. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी मालकातर गावात स्वस्त धान्याच्या काळाबाजार होत आहे असे दिसत असल्याने चौकशी कामी व संशयित वाहनावर कारवाई कामे आदेश केले होते. त्यानुसार तहसीलदार साहेब शिरपूर व पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी मालकातर गावी जाऊन सदर मजकूर व व्हिडिओ संदर्भात चौकशी केली असता नागरिकांनी आम्हास चार महिन्यांपासून रेशनचे धान्य मिळाले नाही अशी हकीकत सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी गावातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 68 वर चौकशी केली त्यावेळी मूळ मालक जागेवर आढळून आले नाहीत व त्यांच्याशी संपर्क देखील झाला नाही म्हणून पुरवठा विभागाने ऑनलाइन पद्धतीने दुकानाच्या साठा चेक केला. त्यावेळी माहे सप्टेंबर महिन्यातील काही साठा वाटप न झाल्याने शिल्लक असल्याबाबत दिसून आले. याबाबत पंचां समक्ष पंचनामा केला असून ऑक्टोबर 2022 मध्ये पुरवठा करण्यात आलेल्या रेशन मला पैकी 59.50 क्विंटल तांदूळ शिल्लक दिसून आला परंतु ऑनलाईन प्रणाली पद्धतीने माहे सप्टेंबर 2022 या महिन्यात पुरवठा केलेल्या साठा पैकी वाटप न झालेला ३६.३१ क्विंटल गहू,७६.३९. विंटर तांदूळ व ३ किलो साखर दिसून आली नसल्याने रास्त भाव दुकानदार श्रीमती जमनाबाई कैलास पाडवी रा. गधडदेव तालुका शिरपूर यांच्या विरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करणे बाबत प्राधिकृत करण्यात आले होते. त्याप्रमाणे वाटप न केलेला व न आढळून आलेला एकूण माल  बाजार भाव किंमत १,५२ ,७८० रुपयांच्या रेशन माल हा संशयित वाहनना मध्ये तसेच उभे असलेल्या संशयित कारच्या मालकांच्या मदतीने परस्पर विल्हेवाट लावली व शासनाचे फसवणूक अपहार केला म्हणून भा. द.वी.कलम 420/ 406 नुसार व जीवनावश्यक वस्तू अधिनियम अनुसार रास्त भाव दुकानदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महसूल प्रशासनाने तात्काळ या तक्रारीची दखल घेत चौकशी करून गुन्हा दाखल केला याबाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त होत असून या परिसरात उभी असलेली ती कार कोणाची? नागरिकांशी चर्चा करणारे ते संशयित दोन तरुण कोन? त्यांच्या या प्रकरणाशी काय संबंध? हे लोक घटनास्थळी का बसले होते? सदर प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी गावकऱ्यांची चर्चा करण्यासाठी हे लोक गेले होते का? व्हिडिओ दिसणाऱ्या दोन वाहनांचे मालक कोण? याद्वारे मुख्य सूत्रधाराच्या देखील पोलीस शोध घेणार का? असे अनेक प्रश्न अजून अनिर्णित असून दाखल गुन्ह्याच्या आधारे पोलीस तपासात अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सबळ पुरावे, व व्हिडिओमध्ये दिसणारे संशयित  इसम यांची सखोल चौकशी करून पोलिसांनी मुख्य आरोपींना देखील जेरबंद करावे अशी सामान्य नागरिकांची व सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने