पिप्री ता. शहादा येथे मादी बिबट्याचा संशयास्पद मृत्यु झाल्याचा प्रकार बुधवारी सकाळी समोर आला शेतकरी शेतात पाहणी करत असताना चारीत बिबटया मृतावस्थेत दिसून आला होता,
पिंप्री येथील शेतकरी संजय श्रीमत पाटील हे बुधवारी केळीच्या शेतात गेले असता, त्यांना शेतातील चारीत बिबटया निपचित पडलेला दिसून आला. बिबटचा श्वास घेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने ग्रामसेवकाला याबाबत माहिती दिली. राणीपूर येथील वनपाल, वनक्षेत्रपाल एम. बी. चव्हाण, आशुतोष मेढे यांनीही पथकासह घटनास्थळी धाव घेत मृत बिबट्याची पाहणी केली. मृत मादी बिबट्या साधारण दोन वर्षांची असून अन्नाचा शोध घेत ती शेतात आली
असावी असा अंदाज आहे. परंतु मृत्यूचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही.
मृत बिबटयाचे सर्व अवयव सुरक्षित असल्याचे तसेच दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मृत बिबटयाचे
शवविच्छेदन करण्यात येऊन व्हिसेरा
तपासणीसाठी नाशिक येथे पाठवण्यातआला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.वासुदेव पावरा यांनी राणीपूर येथे शवविच्छेदन केले.
सहायक उपवनसंरक्षक संजय साळुंखे, राणीपूर वनक्षेत्रपाल एम. बी. चव्हाण, आशुतोष मेंढे, वनपाल विजय मोहिते संजय पवार, एस. एम. पाटील, सुभाष मुकडे, वनरक्षक राधेश्याम वळवी, अमर पावरा, नईम मिर्झा यांनी शेतात भेट देत परिसराची पाहणी केली होती. याबाबत सहायक वनसंरक्षक संजय साळुंखे यांनी सांगितले की, मृत बिबटयावर कुठल्याही प्रकारच्या हल्ल्याच्या खुणा नाहीत बिबटयाचा व्हिसेरा तपासणी अहवाल आल्यावर नेमके कारण समोर येणार आहे.
