जैताणे -बीड येथे सावता परिषदेच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक नुकतीच संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या दोन दिवसीय बैठकीत माळी समाज संघटित करण्याच्या सावता परिषदेच्या कामकाजाची जिल्हानिहाय आढावा बैठक तसेच नूतन प्रदेश कार्यकारिणी घोषित करण्यात आली. नूतन कार्यकारिणीत उत्तर महाराष्ट्रातून जैताणे चे माजी सरपंच संजय खैरनार यांची प्रदेश संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.सावता परिषदेच्या मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात झालेला विस्तारप्रमाणेच उत्तर महा राष्ट्रात गाव तेथे शाखा स्थापन करून माळी समाजाचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न असणार आहे,तसेच राजकीय, सामाजिक पटलावरील माळी समाजाचे उपद्रव मूल्य जोपासून संवर्धित करण्याच्या कल्याणराव आखाडे यांच्या अजेंड्याला पुढे नेण्यात येईल अशी ग्वाही यावेळी संजय खैरनार यांनी उपस्थित मान्यवरांना दिली.
कार्यकारिणी नियुक्तीनंतर कल्याणराव आखाडे यांच्या मार्गदर्शनात उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी शिरपूर येथील युवराज माळी यांची नियुक्ती करण्यात आली.धुळे जिल्हाध्यक्ष पदी सोनगीर येथील दिलीप माळी यांची फेरनिवड तसेच कार्याध्यक्ष पदी रवींद्र सूर्यवंशी यांचीही निवड यावेळी प्रदेश संघटक यांनी जाहीर केली.यावेळी जाहीर करण्यात आलेली प्रदेश कार्यकारिणी
१)श्री.मयुर वैद्य - प्रदेशाध्यक्ष
२)श्री.गणेश दळवी-प्रदेश महासचिव
३)सौ.मनिषाताई सोनमाळी- प्रदेशाध्यक्षा महिला आघाडी
४) प्रविण गाडेकर - प्रदेश उपाध्यक्ष
५) महादेव ताटे - प्रदेश उपाध्यक्ष
६) भास्कर गाढवे- प्रदेश उपाध्यक्ष
७) पांडुरंग कोठाळे - प्रदेश उपाध्यक्ष
८) साधनाताई राऊत -प्रदेश उपाध्यक्ष
९) संतोष राजगुरू - मुख्य संघटक
१०) बाळासाहेब ढगे- प्रदेश संघटक
११) बापुराव धोंडे - प्रदेश संघटक
१२)संजय खैरनार - प्रदेश संघटक
१३) शिवाजी येवारे -प्रदेश संघटक
१४) साहेबराव जाधव - प्रदेश संघटक
१५)विजय शेंडे-प्रदेश सचिव
१६)शरद माने- प्रदेश सचिव
१८) विनित गोरे- सोशल मीडिया प्रमुख
याप्रमाणे आहे.बैठकीसाठी उत्तर महाराष्ट्रातून संजय खैरनार,युवराज माळी,जिल्हाध्यक्ष दिलीप माळी, जिल्हाप्रवक्ते ऍड.ज्ञानेश्वर माळी, रवींद्र सूर्यवंशी, योगेश जाधव ,योगेश माळी आदी उपस्थित होते.प्रदेश कार्यकारिणी आयोजन बीड जिल्हाध्यक्ष किशोर राऊत यांनी केले.उदघाटन लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते पार पडले.सूत्रसंचालन प्रदेश प्रवक्ते डॉ.राजीव काळे यांनी केले.
Tags
news
