शिरपूर तालुक्यातील बोराडी ग्रामपरिषदेच्या लोकनियुक्त सरपंच व ग्रामपरिषद सदस्यांची निवड तालुक्याचे विकासरत्न मा.शालेय शिक्षणमंत्री अमरीशभाई पटेल,नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या सदस्या संसदरत्न डाॅ.हिनाताई गावित,आमदार काशीराम पावरा,धुळे जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष डाॅ.तुषार रंधे व पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संगठनचे जिल्हाध्यक्ष तथा बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे,किविप्र संस्थेचे सचिव निशांत रंधे यांच्या मार्गदर्शनातुन बिनविरोध झाली असुन सुखदेव खुमान भील यांची लोकनियुक्त सरपंचपदी तर प्रभाग 1 मध्ये राहुल विश्वासराव रंधे,शारदाबाई प्रकाश भिल,चंद्रसिंग भरतसिंग पावरा,प्रभाग 2 मध्ये
आरती भीमसिंग भिल,भिवसिंग बुलसिंग भिल, सतीश भास्कर पवार,प्रभाग
3 मध्ये पवार मयुरी सुरेंद्रसिंग,बबन लोटन पाटील,प्रभाग
4 मध्ये उर्मिलाबाई सुनील पावरा,अनिल देवसिंग पावरा,चांदरीबाई रमेश पावरा,प्रभाग
5 मध्ये नीता प्रकाश पावरा,निलेश मोहन महाजन,विद्याबाई राहुल रंधे,प्रभाग
6 मध्ये सोनाली मनोज सत्तेसा,हारसिंग उगला पावरा,अनिता अशोक बडगुजर सर्व सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.गेल्या दहा वर्षांपासुन बोराडीच्या प्रगतीचा रथ भाजपाचे मा.तालुकाध्यक्ष तथा बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे व सरपंच सुरेखाताई पावरा यांच्या नेतृत्वात अतिशय वेगाने दौड घेत आहे.महाराष्ट्रात ग्रामीण,आदिवासी भागातील कोणत्याही ग्रामपरिषदेत झाली नसतील एवढी प्रचंड विकासकामे बोराडीत झाली आहेत.या काळात मोठी पाणीपुरवठा योजना,अमरधाम,आदिवासी बांधवांसाठी अमरधाम,कब्रस्तान,सतीमाता मंदिर,श्रीराम मंदिर,छत्रपती शिवदर्शन शिल्प,कारंजे चौक,महात्मा फुले स्मारक,कर्मवीर शाॅपिंग सेंटर,लोकमाता सावित्रीताई उद्यान,देवमोगरा रस्ता व इतर गावातील काँक्रिटीकरण,पेव्हर ब्लाॅकचे रस्ते,रोपवाटिका,जलशुध्दीकरण प्रकल्प,नविन प्रस्तावित पाणीपुरवठा योजना,जि.प.शाळा भिंतीवरील डिजिटल फलक,चौपाटी,हरित स्थळे अशी अनेक विकासकामे बोराडीत झाली आहेत.त्यामुळे सामान्य नागरिकांपासुन तर राजकीय वर्तुळात राहुल रंधे यांनाच पुन्हा संधी मिळायला हवी असे वातावरण होते.कारण एवढी विकासकामे करणे,झालेली कामे सांभाळणे त्याचे व्यवस्थापन करणे हे पण महत्वाचे आहे.कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर यांच्यापासुन राहुल रंधे यांच्यापर्यंत गावाच्या प्रगतीत रंधे कुटुंबच आहे हे सर्वज्ञात आहे.म्हणून निवडणुक होणार नाही हे मतदारांनी गृहीतच धरले होते.गेल्या वर्षी माझी वसुंधरा अभियान,आर.आर.आबा पाटील अभियानात प्रचंड कामे झाली असुन आता बिनविरोध झाल्यामुळे कामांना अधिक वेग येणार आहे.या बिनविरोध निवडीबद्दल राहुल रंधे यांचे जिल्हाभरातुन व परिसरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.ग्रामपरिषद बिनविरोध होण्यासाठी साहेबराव पितांबर पाटील,शिवाजीराव भटा पाटील,रणजितसिंग पवार,मोहन नारायण महाजन,कैलास बाफना,कविता मालचे,अर्जुन भिल,श्रीकांत पाटील,प्रशांत पाटील,भरत पावरा,सागर पावरा,राजु पावरा व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.
