महापुरुषांच्या अवमान करणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करा - संतप्त अनुयायी यांची मागणी




शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी व मागासवर्गीय समाजातील युवकांनी निषेध मोर्चा काढत महापुरुषांच्या आवमान करणाऱ्या प्रवृत्तीच्या तसेच मागासवर्गीय समाजातील समूहांना समाज माध्यमातून शिवीगाळ करणाऱ्या वाईट प्रवृत्तींवर प्रशासनाकडून कठोर कारवाई करून ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी आज दिनांक ७ डिसेंबर २०२२ रोजी उपविभागीय अधिकारी सो शिरपूर यांना करण्यात आली.

याबाबत असे नमूद करण्यात आले आहे की दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम वर जयभीम या शब्दाचा उल्लेख करत एका इसमाने शिवीगाळ केली आहे व महा मानवांच्या व दलित समाजाच्या अपमान केला आहे. त्यामुळे सदर च्या इसमावर फक्त सायबर क्राईमच्या गुन्हा न नोंदवता त्याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.

सदरच्या व्यक्ती हा पुजारी असल्याच्या बनाव करत असला तरी परप्रांतीय असून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या धर्मांध संघटनांच्या जाळ्याची त्याचे काही हितसंबंध आहेत का याच्या शोध घेण्यात यावा व चौकशी करण्यात यावी.

शिरपूर शहर शांतता प्रिय शहर असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणारे शहर आहे असे असताना अशा माथेफिरू तरुणास पुजारी म्हणून नेमण्याचा मंदिर ट्रस्ट सदस्यांच्या हेतू साशंक आहे तरी ट्रस्टच्या सदस्यांवर देखील ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात यावा.
अशी मागणी विविध संघटनेच्या प्रतिनिधींच्या मार्फत करण्यात आली आहे. यावेळेस दलित समाजातील विविध संघटनांचे युवा प्रतिनिधी उपस्थित होते. शिवाय पोलिसांच्या मोठा बंदोबस्त देखील तैनात होता.
सदरच्या निवेदनावर तमाम आंबेडकरी जनता शिरपूर शहर व तालुका,  सत्यशोधक जन आंदोलन समिती ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, युवाशक्ती संघटना, बहुजन समाज पार्टी, सामाजिक हक्क समिती ,फाईट ग्रुप महाराष्ट्र राज्य व विविध सामाजिक कार्यकर्ते इत्यादींच्या पदाधिकाऱ्यांनी या निवेदनावर सह्या केल्या आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने