बारा हजार रुपये अनुदान असून, सहा हजार रुपयांचे सिमेंटच्या प्लेटांचे शौचालय निष्कृष्ट दर्जाचे बसवून ग्रामस्थांची दिशाभूल करणाऱ्या दोषी ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हे दाखल करा......*




*यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान मार्फत स्वच्छ भारत मिशन अभियानाची चौकशी व्हावी या मागणीचे निवेदन नाशिकविभागीय आयुक्त यांना सादर....*


धुळे प्रतिनिधी.... यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मंगलाताई मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत मिशन अभियानाद्वारे प्रत्येक कुटुंबासाठी वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी 12 हजार रुपये अनुदान ग्रामीण भागात देण्यात आले होते. ज्या ज्या गावांना सिमेंट प्लेटंचे शौचालय उभारले आहे. सदर शौचालय निकृष्ट दर्जाचे असून शासनाच्या बेसलाईनुसार नाहीत. म्हणून कॉन्ट्रॅक्टर व ग्रामसेवक यांनी संगम मताने ग्रामस्थांची दिशाभूल केलेली आहे. अशा गावात चौकशी करून ग्रामसेवक व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे या मागणीचे निवेदन मा विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांना देण्यात आले.
     यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान मुळातच ग्राहकांच्या न्याय हक्का लढण्यासाठी चे मोठे व्यासपीठ आहे. म्हणून विविध प्रश्न हाताळत असताना शौचालय हा ग्रामीण भागातला खूप मोठा प्रश्न आहे कारण उघड्यावर शौचालयामुळे गाव ते सर्व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असते. ही बाब जाणून शासनाने देखील स्वच्छ भारत मिशन अभियानाद्वारे प्रत्येक कुटुंबाला ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांना शौचालय बनवण्यासाठी 12 हजार रुपये अनुदान देण्याचे ठरवले होते. सदर अभियानांतर्गत काही गावांमध्ये ग्रामसेवक व कॉन्ट्रॅक्टर यांनी लाभार्थ्यांना विश्वासात न घेता शौचालयाच्या बांधकामाबाबत माहिती न देता बँकेच्या आणि ग्रामसेवकाच्या संगम मताने तो निधी ग्रामसेवकाने बँकेतून काढून स्वतःकडे ठेवला. अनुदान निधीची रक्कम एकत्र करून ग्रामसेवकांनी सहा हजार रुपये किमतीचे अवजार सिमेंटच्या प्लेटोन द्वारे अधांतरित ठेवलेले शौचालय बनविले. त्या शौचालाचा फक्त फोटो काढून शासनाकडे सादरीकरण केले गेले. सदर शौचालय अद्यापही उपयोगात येत नाही म्हणून परत एकदा लाभार्थी कुटुंबाला उघड्यावर शौचालयासाठी जाण्याची वेळ आली आहे. व याला जबाबदार ग्रामसेवक आहेत. म्हणून यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान मार्फत धुळे जळगाव नंदुरबार नाशिक जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये अवजड प्लेटांची शौचालय असतील त्या गावांची पाहणी करून लेखी तक्रार शौचालयाची फोटो आम्ही काढून देतो. त्यासाठी आम्हास लेखी परवानगी द्या अशी विनंती माननीय विभागीय आयुक्त यांना केले आहे. व सदर प्रकरणात ज्या ग्रामसेवकांच्या कार्यकाळात बनवले गेलेले असतील त्या सर्व संबंधित ग्रामसेवक फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन माननीय विभागीय आयुक्त यांना देण्यात आले. याप्रसंगी
प्रमोद झालटे , नंदकुमार शेवाळे , महेंद्र शिरसाट , मंगलताई मोरे , विद्या जोशी,  जितू पाटील. भुषण ब्राम्हणे इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने