खुनाचे गुन्हयातील ६ वर्षापासून फरार आरोपी जेरबंद शिरपूर शहर पो.स्टे. थे शोध पथकाची कामगीरी

 





शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील 

खूणाच्या गुन्हे मध्ये सहा वर्षांपासून फरार आरोपी गेट बंद करण्यात शिरपूर पोलीस ठाण्याच्या शोध पथकास यश आले आहे.


शिरपुर शहर पो.स्टे. चे पो. नि. ए. एस. आगरकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शिरपुर शहर पो.स्टे. गुरनं. ९८० / २०१६ भादवि कलम ३०२, ३०७, ४५२,३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हयातील ६ वर्षापासून फरार असलेला आरोपी नामे लोटन पितांबर अहिरे वय ३४ रा. तन्हाडी ता. शिरपुर जि.धुळे हा तन्हाडी गावात आलेला असल्याबाबत मिळालेल्या बातमीवरून वरिष्ठांचे मार्गदर्शना खाली शोध पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तन्हाडी गावात जावुन सापळा लावून सदर फरार आरोपीतास शिताफीने ताब्यात घेवून शिरपुर शहर पो.स्टे.ला हजर करून उल्लेखनिय कामगिरी केली आहे.


सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री संजय बारकुंड, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. ए. एस. आगरकर, पोलीस निरीक्षक शिरपुर शहर पो.स्टे. चार्ज उप विभागीय पोलीस अधिकारी शिरपुर विभाग शिरपुर, पोउनि / किरण वान्हे तसेच शोध पथकाचे पोहेकॉ ललित पाटील, लावुराम चौधरी, पोना/मनोज पाटील, पोकों/ उमाकांत वाघ, गोविंद कोळी, विनोद अखडमल, प्रविण गोसावी, मुकेश पावरा, प्रशांत पवार अशांनी मिळून केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने