शिरपूर : केंद्र शासन मार्फत देशभरात स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा अभियान राबविले जात असून शिरपूर वरवाडे नगरपरिषद मार्फत दि. २८ डिसेंबर २०२२ रोजी शिरपूर शहरातील आर. सी. पटेल मेन बिल्डिंग येथील "राजगोपाल भंडारी हॉल" येथे भव्य बक्षिस वितरण समारंभ माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, प्रशासक तथा प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक प्रमोद भामरे तर प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, मुख्याधिकारी तुषार नेरकर, सौ. कृतीबेन भूपेशभाई पटेल, कु. द्वेतादीदी भूपेशभाई पटेल, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, माजी नगरसेवक तथा नगरसेविका, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचा आयोजनाचा उद्देश व संकल्पना आरोग्य सहाय्यक श्रीमती दिपाली साळुंके, उद्यान पर्यवेक्षक सागर कुळकर्णी, प्रकल्प समन्वयक सुषमा पवार यांनी स्पष्ट केली. या कार्यक्रम प्रसंगी शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे प्रशासकिय अधिकारी संजय हासवानी यांनी आभार मानले.
प्रशासक प्रमोद भामरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, स्वच्छता बाबत महिलांचा तसेच सर्वांचा सक्रिय व उत्स्फूर्त सहभाग खूपच आवश्यक आहे. यात महिलांचा सहभाग वाढणे गरजेचे आहे व शिरपूर शहराचे मानांकन वाढावे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे त्यांनी आवाहन केले.
माजी नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल म्हणाल्या, स्वच्छता अभियानात सर्वांचे योगदान महत्त्वपूर्ण असून आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी स्वच्छ सर्वेक्षणात उत्स्फूर्त सहभाग दिला त्यांचे नगर परिषदेच्या वतीने आम्ही आभार मानतो. यापुढेही सर्व घटकांनी, नागरिकांनी, महिला पुरुषांनी स्वच्छ सर्वेक्षणात सकारात्मक प्रतिसाद द्यावा. स्वच्छ भारत अभियान हे जनआंदोलन झाले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्याधिकरी तुषार नेरकर यांनी शहर स्वच्छ सुंदर होणे कामी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे असे प्रतिपादन केले.
सदर कार्यक्रमात शिरपूर शहराचे ब्रँड अँबेसेडर माजी नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, शिक्षण मंडळ सभापती राजेंद्र अग्रवाल यांची नियुक्ती करुन सन्मान करण्यात आला. तसेच स्वच्छ हॉटेल अक्षय रेस्ट्रो व पायल हॉटेल, स्वच्छ हॉस्पिटल गायत्री हॉस्पिटल व सेवा हॉस्पिटल, स्वच्छ शाळा ए. आर. पटेल सीबीएसई स्कूल व शिरपूर वरवाडे नगरपरिषद संचलित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्र. ९, स्वच्छ आर. डब्ल्यू. ए. किरण सोसायटी व विद्याविहार कॉलनी, स्वच्छ सरकारी कार्यालय उपविभागीय कार्यालय व शिरपूर वरवाडे नगरपरिषद कार्यालय, स्वच्छ मार्केट कृषि उत्पन्न बाजार समिती, सेवाभावी संस्था (एन. जी. ओ.) बालाजी सेवा समिती व मुकेशभाई चॅरिटेबल ट्रस्ट, स्वच्छ वार्ड क्र. ९ साठी माजी नगराध्यक्ष प्रभाकराव चव्हाण व माजी उपनगराध्यक्ष सौ. छाया ईशी, वार्ड क्र. ५ साठी माजी नगरसेवक हेमंत पाटील व माजी नगराध्यक्ष संगीता देवरे, वार्ड क्र. १ साठी माजी नगरसेवक रोहित रंधे व माजी नगरसेविका सुलोचना साळुंके, वार्ड क्र. 2 साठी माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व माजी नगरसेविका सौ. रंजनाताई सोनवणे, आत्मनिर्भर वार्ड क्र. १३ साठी माजी नगरसेविकास सौ. चंद्रकला संतोष माळी व माजी नगरसेवक दिपक महादू माळी, झिरो वेस्ट मोहीम अंतर्गत सर सय्यद अहमद खान नगरपरिषद उर्दू प्रा. स्कुल नं.४/५ शिरपूर, जुहू जागृती प्री. प्रा. उर्दू स्कुल शिरपूर, बेस्ट चॅम्पियन मॅन संतोष महारु माळी, कमरूद्दीन कुतुबुद्दीन शेख, मयूर नंदकिशोर धाकड, बेस्ट चॅम्पियन वुमन कु. द्वेताबेन भूपेशभाई पटेल, दिव्या दीप जैन, मिनाक्षी अंकुश राठी, ज्योती चेतन पाटील, चारुलता सुनील पाटील, राखी अग्रवाल, नीलिमा पाटील.
भव्य चित्रकला स्पर्धा विजेते श्रावणी भिकन पाटील, वर्षा गौतम शर्मा, लकी भैयासिंग राजपूत, कोमल सुभाष माळी, प्रज्ञा संदीप पाटील, प्रियंका रघुनाथ माळी, हंसिका मनिष अहिरे, करीना प्रेमसिंग कुशवाह, सूर्याक्षी सूर्यकांत पाटील, पथनाट्य सादरीकरण साठी आर. सी. पटेल शाळा क्रांतीनगर प्रदिप गहिवरे, सर्व सन्मानमूर्ती व्यक्तींना प्रमाणपत्र तसेच बक्षिस देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक हर्षल गिरासे, देंवेद्र राजपूत, नाजेराबी शेख, रेखा सोनार, चंद्रकांत सोनवणे, नगर अभियंता माधवराव पाटील, स्वीय सहायक सुनील जैन, स्वच्छता निरीक्षक जितेंद्र अहिरे, प्रकल्प संचालक प्रसाद लढे, प्रज्ञाशील निकम, मनोहर थोरात, तसेच सर्व नगरपरिषद कर्मचारी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दिपाली साळुंके यांनी केले.
