२ अटल चोरट्यांकडून ६ लाख ८० हजार रुपये किमतीच्या 14 मोटरसायकली जप्त शिरपूर शहर पोलीस स्टेशन शोध पथकाची कामगिरी

 

शिरपूर प्रतिनिधी  - शिरपूर शहर पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीच्या दाखल गुन्ह्यावरून समांतर तपास करत असताना अटकेत आलेल्या कुख्यात २ आरोपींकडून शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाला ०६ लाख ८० हजार रुपये किमतीच्या १४ मोटरसायकली जप्त करण्यात यश आले आहे.


दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शहरातील इंदिरा हॉस्पिटल आवारातून हिरो होंडा कंपनीचे मोटरसायकल हँडल लॉक तोडून चोरी करण्यात आली होती. याबाबत पवन तुकाराम मोरे रा.ओमनगर शिरपूर जिल्हा धुळे यांनी शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केले होते. सदर गुन्ह्याच्या तपास करत असताना शिरपूर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने शिरपूर फाटा आमोदे येथून संशयित इसम अरबाज शहा अफजल वय 24 रा. औरंगपुरा तालुका रहिमपुरा जिल्हा खरगोन मध्य प्रदेश हा मोटर सायकल सहित मिळून आला त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याच्या साथीदार शाहिद शाह सब्बिर  शाह वय 19 रा. औरंगपुरा तालुका रहिमपुरा जिल्हा खरगोन मध्य प्रदेश असे आरोपींना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांच्या ताब्यातून खरगोन येथून चोरीच्या गुन्हातील मोटरसायकल शिरपूर व इतर मोटरसायकल मध्य प्रदेश राज्यातील तसेच इतर ठिकाणाहून चोरी केलेल्या मोटरसायकल अशा १४ मोटरसायकली किंमत रुपये ०६ लाख ८० हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या तपासात चार गुन्हे उघड किस करण्यात पोलिसांना यश आले आहे.


सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री संजय बोरकुंड ,मा.अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ए एस आगरकर पोलीस निरीक्षक शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक किरण बाऱ्हे ,पोलीस कॉन्स्टेबल ललित पाटील, लादूराम चौधरी, मनोज पाटील, गोविंद कोळी ,विनोद अखंडमल,प्रवीण गोसावी ,मुकेश पावरा, प्रशांत पवार तसेच होमगार्ड नाना अहिरे मिथुन पवार चेतन भावसार व शरद पारधी इत्यादींच्या पथकाने केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने