नुकत्याच नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुल मध्ये संपन्न झालेल्या वूशू राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व जिभाऊ साहेब पोपटराव गोविंदराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय मुकटी येथील विद्यार्थ्यांनी वूशू खेळामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
वूशू स्पर्धेत किरण नथू कुऱ्हाडे इयत्ता 10वी (56 किलो वजन गट) प्रथम क्रमांक, प्रशांत ज्ञानेश्वर देवरे इयत्ता 10वी( 60 किलो वजन गट) प्रथम क्रमांक ,प्रसाद भाईदास पाटील इयत्ता 9वी( 85 किलो वजन गटात )प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे .तर कुणाल मगन चौधरी इयत्ता 10वी याने (65 किलो वजन गटात) द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे चेअरमन गुलाबराव पाटील, सेक्रेटरी नगराज पोपटराव पाटील ,व्हा. चेअरमन भटूलाल शर्मा ,संचालक भिकाजी भिवसन पाटील, सुभाष चौधरी ,युवराज पाटील ,छोटू पाटील ,विश्वनाथ सैंदाणे, एकनाथ पाटील आदींनी अभिनंदन केले आहे. विजेत्या विद्यार्थ्यांना प्राचार्य ईश्वर बडगुजर ,पर्यवेक्षक विश्वनाथ सैंदाणे, क्रीडाशिक्षक पी .वाय .कागणे आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
