नंदुरबार - दिनांक 31/12/2022 रोजी 2022 हे वर्ष संपून 20023 ह्या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांकडून विविध प्रकारचे आयोजन करण्यात येवून नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात व उत्साहात करण्यात येते. परंतु नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात व जल्लोषात करतांना कोणताही अनूचीत प्रकार घडू नये यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून खबरदारी म्हणून विविध उपायोजना करण्यात येणार आहेत. त्यात प्रामुख्याने संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत ठिक-ठिकाणी नाकाबंदी करुन दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बस स्थानक, रेल्वे स्टेशन, गर्दीचे ठिकाण व इतर महत्वाच्या ठिकाणी घातपात विरोधी तपासणी करण्यात येणार आहे.
नवीन वर्षांच्या स्वागतासाठी काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन शांतता भंग करणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या इसमांविरुध्द् तसेच दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुध्द् विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. दारु पिऊन वाहन चालवितांना आढळून आलेल्या वाहन चालकांचे परवाने (लायसन्स) निलंबन करण्याचे प्रस्ताव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांचे कार्यालयात पाठवून त्यांचेवर परवाने (लायसन्स) निलंबनाची कारवाई करण्यात येईल. तसेच बस स्थानक, रेल्वे स्थानक, बाजार पेठ इत्यादी गर्दीच्या ठिकाणी सोनसाखळी चोरी (चैन स्नॅचिंग), चोरी, पाकिटमार अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून साध्या वेषातील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
गर्दीच्या ठिकाणी व बाजार पेठांमध्ये टवाळकी करुन मुलीची छेडछाड काढण्याच्या प्रकारांना थांबविण्यासाठी टवाळकी करणाऱ्या युवकांविरुद्ध निर्भया पथकांकडून कठोर कायदेशीर कारवाई येणार आहे.. त्याचप्रमाणे नवीन वर्षाच्या स्वागताच्या उत्साहात काही समाज कंटकांकडून अनुचीत प्रकार होणार नाहीत यासाठी बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऍप, ट्विटर व इतर सोशल मीडियावर तेव निर्माण करणाऱ्या व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडीओ, किंवा पोस्ट प्रसारीत करणाऱ्यांविरुध्द नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सायबर सेलमार्फत सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
नवीन वर्षाच्या बंदोबस्तासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून 09 पोलीस निरीक्षक, 31 सहा. पोलीस निरीक्षक / पोलीस उप निरीक्षक, 456 पोलीस अंमलदार असा एकुण 499 पोलीस अधिकारी व अंमलदाराचा बंदोबस्त संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली तैनात करण्यात आलेला आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की, नवीन वर्षाचे स्वागत करतांना कोणीही दारु पिऊन वाहन चालवू नये. दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांचे जिवितास देखील धोकादायक आहे. नागरीकांनी स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियमांचे पालन करावे. तसेच कोणीही मद्यपान करुन वाहन चालवू नये. दारु पिऊन वाहन चालवितांना कोणी आढळून आल्यास त्यांचेवर गुन्हे दाखल करुन परवाने (लायसन्स) निलंबित करणेची कारवाई करण्यात येईल. तसेच नवीन वर्षाचे स्वागत शांततेत व उत्साहात साजरे करावे असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. पी. आर. पाटील यांनी केले आहे.
%20(7).jpeg)