भामपूर ता. शिरपूर येथील आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालय येथे महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला,सर्वप्रथम मुख्याध्यापक श्री व्ही पी दीक्षित व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी घटना समितीचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.त्यानंतर आपल्या भाषणात मुख्याध्यापक श्री व्ही पी दीक्षित यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व महत्त्वाच्या घटनांचा घटनाक्रम विध्यार्थ्यासमोर मांडला.
त्यांनतर श्री डी व्ही ठाकरेयांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या राज्यघटने साठी दिलेल्या योगदाना विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए ए चौधरी यांनी तर आभार श्रीमती माहेश्वरी मॅडम यांनी मानलेत.
कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतलेत.
