सारंगखेडा यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल* नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे




शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे श्री.दत्तजयंती निमित्त 7 डिसेंबर,2022 पासून एकमुखी दत्तप्रभु यांची यात्रा भरणार असून यात्रा कालावधीत अवजड वाहनांमुळे अपघात होवून  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी 7 ते 31 डिसेंबर,2022 या कालावधीत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे 33 (एस) अन्वये या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतुक बंद करुन त्यांच्या वाहतुकीच्या मार्गात बदल करण्याचा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

यात्रा कालावधीत दोंडाईचाकडून शहादामार्गे गुजरातकडे जाणारी अवजड वाहने ही दोंडाईचा चौफुलीवरुन प्रकाशामार्गे. गुजरात राज्याकडून अक्कलकुवा-तळोदा मार्गे येणारी जड वाहने प्रकाशा पुलावरुन नंदुरबार मार्गे दोंडाईचाकडे, शहादाकडून दोंडाईचाकडे जाणारी अवजड वाहने शहादा-अनरद बारी, शिरपूरमार्गे व धुळेकडून शहादाकडे जाणारी अवजड वाहने सोनगीर फाट्यावरुन शिरपूर येथून वडाळी-अनरद बारीमार्गे शहादाकडे वळविण्यात आली असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने