दोंडाईचा येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, धुळे व जिल्हा क्रीडा परिषद, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिंदखेडा तालुकास्तरीय मैदानी शालेय क्रीडा स्पर्धेत दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी यश यश संपादन केले.
14 वर्ष वयोगटातील भावेश बागलने 100 मीटर व 200 मी. धावणे आणि थाळी फेक या तिन्ही स्पर्धेत प्रथम क्रमाक व मुलींच्या 14 वर्षे वयोगटात जागृती रावलने 600 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.
17 वर्षे वयोगटातील 100 व 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत नोमान बेलदारने प्रथम,100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत ध्रुव महाजनने द्वितीय क्रमांक, थाळी फेकमध्ये राजवर्धन गिरासे प्रथम, हॅमर थ्रो स्पर्धेत गौरेश ठाकरे प्रथम,उंच उडीत कु.हर्षिता जाधवने द्वितीय,तर तिहेरी उडीत साहिल ठाकूरने द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच मुलांच्या गटात 4×100 मीटर रिले रेस या सांघिक खेळात शिंदखेडा तालुक्यातील सहभागी 12 शाळांच्या संघातून भावेश वाघ,नोमान बेलदार,ध्रुव महाजन,साहिल ठाकूर,राजवर्धन गिरासे या रोटरी स्कूलच्या संघाने प्रथम क्रमांक पटकविला.या खेळाडूंना अजय हजारे, जितेंद्र भारद्वाज यांचे मार्गदर्शन लाभले असून प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या सर्व खेळाडूंची जिल्हा स्तरावर होणाऱ्या क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
खेळाडूंच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष श्री हिमांशु शाह,उपाध्यक्ष डॉ. मुकुंद सोहोनी, डॉ. राजेश टोणगांवकर, श्री पी. सी. शिंदे, प्राचार्य एम.पी. पवार यांनी समाधान व्यक्त केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
