ज्ञानोपासक शिक्षण मंडळी संचलित वाल्मीक ऋषी माध्यमिक विद्यालय तावखेडा (प्र.न.) ता. शिंदखेडा जि. धुळे येथे महामानव क्रांतीसुर्य, ज्ञानाचे महासागर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पवित्र पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाच्या कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय मुख्याध्यापिका श्रीम. पी.पी. महिरे -वाघ,उप मुख्याध्यापक श्री. एस. एस. पाटील ,ज्येष्ठ नवोपक्रमशील शिक्षक श्री. एन. पी.भिलाणे,पर्यवेक्षक श्री. सी. झेड्. कुवर यांच्या सुयोग्य नियोजनाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यालयाचे विज्ञान कोडे विजेते विद्यार्थी कु.वैष्णवी गिरासे व प्रेमराज पेंढारकर या विद्यार्थ्यांना अनुक्रमे कल्पना चावला व थोर शास्त्रज्ञ डाल्टन यांच्या भूमिकेत अभिवादन करण्यात आले. श्रीम. पी.पी. महिरे -वाघ यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे विचार आचरणात आणणे ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले.श्री .ए.के. सावंत ,श्री. एस. एस. पाटील व श्री. एन.पी. भिलाणे यांनी डॉ. बाबासाहेबांचे समाज परिवर्तनाचे विचार, संघर्षमय जीवनाची यशोगाथा व माणसाला माणूसपण देण्यासाठीची धडपड व आदर्श विद्यार्थी कसा असावा? असे मत आपल्या मनोगतातून व्यक्त केले. जेष्ठ उपक्रमशील शिक्षिका श्रीम. मंगलाताई कुवर ,राज्य आदर्श कला शिक्षक श्री ए.के. सावंत, ज्येष्ठ उपक्रमाशील शिक्षक श्री. पी. एच. लांडगे ,श्री नितीन पाटील यांची उपस्थिती प्रमुख पाहुणे म्हणून लाभली होती.
याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अभिवादनपर मनोगत व्यक्त केले. श्री. एन.पी .भिलाणे यांना राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याने व ज्ञान प्रबोधिनी, छात्र प्रबोधन पुणे यांच्याकडून "प्रबोधन दूत" म्हणून अभिनंदनीय निवड झाल्याने मंगल पुष्पगुच्छ , शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश संपादन करणारे विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक त्याचप्रमाणे बालदिन व संविधान दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले व मार्गदर्शक शिक्षक श्री. एस. एस. पाटील व श्री. ए.के. सावंत यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे कनिष्ठ लिपिक श्री जितेंद्र राजपूत व चुडामन धनगर यांनी मोलाचे सहकार्य केले.
