शिरपूर येथील एन-मुक्ता संघटनेच्या मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद; सर्वांनी दिली विजयाची हमी*



शिरपूर -

       दि. २९/१२/२०२२ रोजी शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या एच. आर. पटेल महिला महाविद्यालय, फार्मसी कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, बी. एड. कॉलेज, एस. पी.  डी. एम. कॉलेज, कला महाविद्यालय, तसेच बामखेडा व थाळनेर महाविद्यालयातील एन-मुक्ता संघटनेच्या सर्व प्राध्यापकांचा मेळावा विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांच्या निवडणुकीच्या धरतीवर आय. एम. आर. डी. ए. च्या सभागृहात पार पडला. *यावेळी शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. राजगोपाल भंडारी व सचिव मा. प्रभाकर चव्हाण यांनी मेळाव्यातील उपस्थित प्राध्यापकांना मार्गदर्शन केले तसेच त्यांनी एन मुक्ताच्या सर्व उमेदवारांना विजयाची हमी दिली*. एन मुक्ता संघटनेच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन मा. राजगोपाल भंडारी व मा. प्रभाकर चव्हाण यांनी आपल्या व इतर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांना केले. मा. प्रभाकर चव्हाण यांनी विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य व व्यवस्थापन परिषद सदस्य असतानाचे अनुभव कथन केले. तसेच, मतदान कसं करावं या संदर्भात सर्व प्राध्याकांना सखोल मार्गदर्शन केले. मा. राजगोपाल भंडारी यांनी आपल्या भाषणात निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी अगदी तंतोतंत आराखडा तयार कसा करावा, याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी एन-मुक्ता संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन बारी यांनी एन-मुक्ता संघटनेच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा घेतला तर संघटनेचे सचिव प्रा. डॉ. अविनाश बडगुजर यांनी मतदान करताना घ्यावयाची काळजी कशी घ्यावी यावर दृष्टीक्षेप टाकला याप्रसंगी, एन-मुक्ता संघटनेचे बिनविरोध निवडून आलेल्या अभ्यास मंडळाचे सदस्य व अधिसभा सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विचारमंचावर प्राचार्या डॉ. शारदा शितोळे, नवनियुक्त प्राचार्य सिनेटर डॉ. वैशाली पाटील, प्राचार्य डॉ. संजय बारी, प्राचार्य सुराणा इ. मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्याला शिरपूर शहर व परिसरातील सर्व महाविद्यालयातील सुमारे 145  प्राध्यापक उपस्थित होते. तसेच एन-मुक्ता चे केंद्रीय, जिल्हा पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गजानन पाटील तसेच आभार प्रदर्शन डॉ. दिनेश भक्कड यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने