शिंदखेडा तालुक्यातील मांडळ या ग्रामपंचायतची पंचवर्षी सार्वत्रिक निवडणूक सन 2018 मध्ये घेण्यात आली होते. तत्कालीन पर्यटन मंत्री माननीय जयकुमार जी रावल यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास परिवर्तन पॅनल ने निवडणूक लढविली होती. यात लोकनियुक्त सरपंच डोंगर गंगाराम बागुल व बहू मताने ग्रामपंचायत सदस्य भारतीय जनता पार्टीचे विचाराचे निवडून आले होते. त्याच वेळी माननीय आमदार जयकुमार जी भाऊ रावल यांच्याशी चर्चा करून मांडळ ग्रामपंचायत गट नेता रामकृष्ण जगन्नाथ मोरे यांनी जाहीर केले होते की, सरपंच पद हे लोकनियुक्त असल्याने डोंगर गंगाराम बागुल हे 5 वर्ष सरपंच असतील व उपसरपंच पद हे निवडून आलेले सदस्यांना 1-1 वर्षासाठी देण्यात येईल. ठरल्या प्रमाणे 30 डिसेंबर 2018 मध्ये 1)विजय अशोक मोरे हे पहिले उपसरपंच झाले
2) कल्पना बाई ध्यानेश्वर पवार
3) बेबाबाई अशोक शिंदे
4)मिनाबाई सुधाम भामरे
आणि आज दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी 5 वा उपसरपंच वसंत रतन मोरे यांची मांडळ ग्रामपंचायत उपसरपंच पदी ठरल्या प्रमाणे बिनविरोध निवड करण्यात आली.
वसंत रतन मोरे यांना उपसरपंच पदी निवड करण्यासाठी मांडळ ग्रामपंचायत सरपंच डोंगर गंगाराम बागुल, गोविंदा गंगाराम देवरे ग्रामपंचायत सदस्य, कल्पना पवार, विजय अशोक मोरे, मिनाबाई सुधाम भामरे, बेबाबाई अशोक शिंदे, चंद्रकलाबाई अभिमन्यू ठाकरे, हे सदस्य उपस्थित होते.
वसंत रतन मोरे यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव नामनिर्देशन पत्र आल्याने या निवडणुकीचे निर्णय अधिकारी तथा सरपंच डोंगर गंगाराम बागुल यांनी बिनविरोध निवड जाहीर केली.व ग्राम सेवीका सारीका गिते यानी काम पाहीले
या प्रसंगी मांडळ ग्रामपंचायत गट नेता रामकृष्ण मोरे,मांडळ गावातील विकासो चेअरमन पोपट चिंधा देवरे, व्हायचेअरमन भिला राघो शिंदे,माजी चेअरमन दिलीप आत्माराम मोरे, सेवा निवृत्ती माजी सैनिक,साहेबराव रतन मोरे, बबन पंढरीनाथ शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामनाथ मालचे, परशुराम पिंपळे,विकास सोसायटी संचालक ह.भ.प.दिलीप बागुल, एकनाथ कथु सोनवणे. गंजीधर बागुल, पूना भुता बागुल, गुलाब पवार, मच्छिद्र ईशी, मनोहर पाटील, ज्ञानेश्वर पवार, अशोक शिंदे,ज्ञानेश्वर भामरे,संभाजी बागुल, विश्वास कुवर,ज्ञानेश्वर बागुल, श्रीपत पवार,अनिल मोरे, जयभीम सोनवणे,विकास आंनदा बागुल,चिना शिंदे, प्रकाश ठाकरे,प्रदीप पवार,चेतन मोरे,रघुनाथ बागुल,भाईदास मालचे,रावसाहेब शिंदे, अमोल वाघ.आदी मांडळ ग्रामस्थ मोठ्या संख्ये ने उपस्थित होते.
