नववर्षाच्या स्वागतासाठी गोल्ड व्हॅलीत कार्यक्रमाचे आयोजन* *मैदानी व मनोरंजनात्मक खेळ आणि वैयक्तिक व सामूहिक नृत्य स्पर्धा*

 



दापोली: दापोली तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या गोल्ड व्हॅलीत नववर्षाच्या स्वागतार्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 ते रात्री 1 या दरम्यान विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्या आहेत.मैदानी खेळात क्रिकेट, टेनीस व बॅडमिंटन या खेळांच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मनोरंजनात्मक खेळात संगीत खुर्ची,बादलीत चेंडू टाकणे,फुगे फोडणे,निंबू चमचा,बेडूक उड्या इत्यादी मनोरंजनात्मक खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेत विजेत्या ठरणा-या मुलांना आकर्षक वस्तूरूप बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.याचबरोबर भक्तीगीत, भावगीत, देशभक्तीपर गीत, फिल्मी गीत इत्यादी गायन तसेच वैयक्तिक व सामूहिक नृत्य गोल्ड व्हॅलीतील कलाकार सादर करणार आहेत. शेवटी रात्री 12 वाजेपर्यंत नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.

           या कार्यालयास गोल्ड व्हॅलीतील सर्व बांधवांनी आपल्या परिवारासह उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक सुशिलकुमार पावरा व राजेश झगडे यांनी कार्यक्रम पत्रिकेद्वारे केले आहे.खेळ व गायन नृत्य स्पर्धेत भाग घेणा-या कलाकारांनी  9665006463 या नंबर वर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने