.
धुळे जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक संघाने राजीव गांधी माध्यमिक विद्यालय धुळे येथे सन 2021- 22 मध्ये प्राप्त केलेले अभिनंदनीय विशेष पुरस्कार , गौरवपूर्ण कार्य व विज्ञान संघातील सेवापुर्ती व सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश संपादन करून मानाचा तुरा रोवणाऱ्या शिक्षक मुख्याध्यापक बंधू- भगिनी यांचा गौरवपूर्ण सन्मान सोहळा राज्य विज्ञान संघाचे कार्याध्यक्ष श्री. पी.झेड् कुवर , यांच्या प्रमुख उपस्थितीत व कार्याध्यक्ष श्री. संजय पवार यांच्या अध्यक्षतेत मोठ्या उत्साहात गौरवपूर्ण दिमाखदार पद्धतीत संपन्न झाला. संघाचे जेष्ठ मार्गदर्शक भाऊसो. सुहासजी सोनवणे, जिल्हा उपक्रम समिती प्रमुख संजयजी गोसावी, आदर्श मुख्याध्यापक बी.पी. देवरे (डांगुर्णे), शिंदखेडा तालुका विज्ञान संघ अध्यक्ष श्री रविंद्र चित्ते, प्राचार्य डी आर पगारे ( डॉ.जगन्नाथ वाणी (केले) माध्यमिक विद्यालय देवपुर धुळे), आदर्श शिक्षक जयवंतराव सोनवणे यांची उपस्थिती प्रमुख पाहुणे म्हणून लाभली होती.
याप्रसंगी विज्ञान संघातील आदर्श शिक्षक रणजीत शिंदे यांचे वडील माजी प्राचार्य, कुसुंबा गावाचे माजी सरपंच स्व. प्रकाशचंद्र रामचंद्र शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र पावन स्मृतीना विनम्र अभिवादन करण्यात आले.
राज्य आदर्श शिक्षक जयवंतरावजी सोनवणे यांचा सुपुत्र सौरभ सोनवणे यांनी एम.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण होऊन कक्ष अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
सेवापूर्ती गौरव-
मा. के.के. वाघ (मुख्याध्यापक म.ज्यो. फुले विद्यालय दुसाने ता. साक्री),
मा.बी.व्ही. श्रीराम (मुख्याध्यापक मा.वि. विद्यालय गिधाडे), मा.आर डी चौधरी (मा. अध्यक्ष शिंदखेडा तालुका विज्ञान -गणित अध्यापक संघ).
सन्मान सोहळा मान्यवरांचा-
मा.संजय पवार (अध्यक्ष टी.डी.एफ .महानगर धुळे),
मा .पी .झेड् कुवर (कार्याध्यक्ष राज्य विज्ञान संघ),
मा. के .डी. बच्छाव ( कोषाध्यक्ष धुळे टी.डी.एफ.) , मा सुधाकर माळी ( मुख्याध्यापक आस्तिकमुनी मा.वि. वर्षी) , मा. नारायण पुंडलिक भिलाणे ( राज्यस्तरीय श्री. छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार),
मा. जयवंतराव सोनवणे (टी.डी.एफ. महानगर), मा. के .सी. साळुंखे (आदर्श शिक्षक पुरस्कार), मा.भरत पाटील (आदर्श शिक्षक पुरस्कार), मा.रणजीत शिंदे (आदर्श शिक्षक), मा. डी.पी. पाटील (आदर्श शिक्षक), हर्षल पवार (आदर्श शिक्षक ), ए. यु. बागुल (आदर्श शिक्षक), के. एन. माळी ( साक्री तालुका ग्राहक कल्याण फाउंडेशन), बी.पी. देवरे (आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार), हेमराज फकीरा अहिरे ( आदर्श विद्यार्थी पुरस्कार), संजय गोसावी पर्यवेक्षक (मा.वि.विरदेल), नरेंद्र कापडे (उपमुख्याध्यापक), जे.डी. भदाणे (आदर्श शिक्षक), सी.टी .पाटील (आदर्श शिक्षक), भागवत पाटील (आदर्श शिक्षक), एस .बी. मोरे (तु.रा .पाटील. मा.वि मोराणे) यांचा गौरव पूर्ण सन्मान सोहळा मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
