दोंडाईचा येथील पॉसिबल इंग्लिश अकॅडमी चा 14 वा वर्धापन दिन प.पु.प.म. श्री गांजा पुरकर बाबा शास्त्री यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न याप्रसंगी अकॅडमीचे संचालक श्री. अविनाश पाटील व सौ. गायत्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सुसंस्कार संपन्न घडविण्यासाठी अध्यात्मिक विचारांची गरज ओळखून या कार्यक्रमाचे आयोजन केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत प.पू.प.म उत्तमराज दादा येळमकर, पिंप्राळा व ऋतुराज दादा दख्खनकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत अध्यात्मिक ज्ञानाची गरज आहे असे मत आपल्या मनोगतातून व्यक्त चंद्रजीत नारायण भिलाने,कु. किर्ती माळी, कुमारी पूजा पानपाटील यांनी उत्कृष्ट सुत्रसंचालन व आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल विद्यार्थी, पालक यांच्यातर्फे पॉसिबल इंग्लिश अकॅडमीचे संचालक श्री अविनाश पाटील व सौ. गायत्री पाटील यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत अध्यात्मिक विचारांची गरज... - प.पु.प.म. गांजापुरकर बाबा शास्त्री
byMahendra Rajput
-
0
