*l
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून साकार शाब्बास गुरुजी या प्राथमिक शिक्षकांना प्रेरणा देणाऱ्या उपक्रमात धुळे तालुक्यातील अंचाडेतांडा येथील मुख्याध्यापिका श्रीमती.अरुणा पवार यांनी ऊसतोड पालकांच्या पाल्यांचे स्थलांतर थांबिविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा लेखा जोखा PPT द्वारे मांडला.
व विविध उपक्रमांद्वारे शाळेची पट वाढवून शाळा द्विशिक्षकी वरून आज 132 पट व 5 शिक्षक कार्यरत आहेत. कोरोना काळात खंड न पडू देता सर्व शिक्षकांनी अध्यापन कार्य सुरू ठेवले.स्थलांतर झालेल्या विद्यार्थ्यांना बारडोली येथे फडावर जावून त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले.स्थलांतर रोखून त्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू असून विविध उपक्रमांद्वारे शाळेची पट वाढ सुरू असून बाहेर गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात.
यावेळी शाळेतील सर्व स्टाफ यांचे व शालेय कार्य. क्षेत्रीय अधिकारी यांचे मार्गदर्शन यातून शाळा प्रगतीपथावर असल्याचे श्रीमती.अरुणा पवार यांनी सांगितले.
मा.मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती. भुवणेश्र्वरी मॅडम यांनी PPT द्वारे उपक्रमाबाबत सर्विस्तर माहिती पाहून वेळोवेळी कौतुक करत प्रोत्साहन दिले. व शाळेतील 25 विद्यार्थांना भेट घेण्यासाठी आमंत्रित केले. मा.शिक्षण अधिकारी (प्राथ) श्री.राकेश साळुंके यावेळी उपस्थित होते,
या उपक्रमासाठी धुळे तालुक्याच्या मा. गट शिक्षणाधिकारी श्रीमती.सुरेखा देवरे, मुकटी बीटचे मा.शिक्षणविस्तार अधिकारी श्री. व्ही.बी.घुगे,मुकटी केंद्राचे मा.केंद्रप्रमुख अशोक देसले,यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
