मुलींनी आत्म रक्षण करणे ही काळाची गरज* *माजी मंत्री आ. जयकुमार रावल* *दोंडाईचात बेटी बचाव *बेटी पढाव तर्फे*आत्मरक्षणाचे* *प्रशिक्षण* *शिबिराचे आयोजन* दोडाईचा (अख्तर शाह)



दोंडाईचा: मुलींवरील छेडछाड व  अत्याचार या बाबी रोखण्यासाठी मुलींना आत्मरक्षणाचे धडे देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी केले. 
आज दोंडाईचा येथील दादासाहेब रावल स्टेडियम येथे  बेटी बचाव बेटी पढाव महाराष्ट्र प्रदेशच्या धुळे ग्रामीण विभाग तर्फे मुलींच्या आत्मसंरक्षण शिबीर चे भव्य आयोजन  करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. 
    यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आ. जयकुमार रावल, धुळे जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., बेटी बचाव बेटी पढावो च्या महाराष्ट्र प्रदेश संयोजिका सौ. शुभा पाध्ये फरांदे, दोंडाईचा न. पा. चे मुख्याधिकारी मा. देवेंद्र सिंग परदेशीं, उपमुख्याधिकारी श्री. हर्षल भामरे,बेटी बचाव बेटी पढाव च्या महाराष्ट्र प्रदेश च्या प्रभारी सौ. मृणालिनी बागल, बेटी बचाव बेटी पढाव चे ठाणे शहर संयोजक श्री. सुरेश पाटील, धुळे ग्रामीण च्या संयोजिका सौ. चंद्रकला सिसोदिया उपस्थित होते. 
 पुढे बोलताना आ. रावल म्हणाले आ. जयकुमार भाऊ रावल यांनी बेटी बचाव बेटी पढाव कसे गरजेचे आहे व त्या सोबतच आत्म संरक्षण किती महत्वाचे आहे या बद्दल माहिती देऊन आदरणीय राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ साहेब यांचे उदाहरण दिले, भारतात आता पर्यंत राष्ट्रपती, पंतप्रधान पदावर महिला आरूढ झाल्या आहेत हे सांगून आपली भारतीय संस्कृती किती महान आहे व श्रेष्ठ आहे हे सांगितले व कराटे प्रात्यक्षिक चे कौतुक केले. 
 शहरातील गर्ल हायस्कूल, आर. डी. एम. पी. हायस्कूल, स्वामी विवेकानंद स्कूल, रोटरी स्कूल, वसुधा पब्लिक स्कूल,अहिंसा स्कूल, रॉयल प्रताप स्कूल इत्यादी शाळेतून मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सोबत त्या त्या शाळेतील शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक उपस्थित होते या ठिकाणी कराटे, ज्युडो, ताईकांडो ट्रेनर श्री अजमल सिकलीकर व त्यांच्या टीम ने आत्म सुरक्षा चे चित्त थरारक प्रात्यक्षिक दाखवले व मुलींना कराटे, ज्युडो साठी प्रोत्साहन देऊन त्यांना शिक्षण देणार असे सांगितले कार्यक्रम साठी धुळे येथून आलेल्या ऍड.शीतल जावरे यांनी मुलींना पोक्सो ऍक्ट ची माहिती देऊन त्यांना चांगला व वाईट स्पर्श बद्दल माहिती दिली मुलींना सुरक्षा साठी मदत चे *1098 व 112 नंबर चा* उपयोग करावा असे सांगितले, तसेच धुळे येथून आलेले महिला व बाल कल्याण विभाग चे संरक्षण अधिकारी श्री देवेंद्र मोहन यांनी बाल विवाह प्रतिबंधक कायदा ची माहिती देऊन बाल विवाह टाळावे, असे प्रकार आपल्या परिसरात होत असल्यास माहिती द्यावी व बालविवाह प्रतिबंध ची प्रतिज्ञा सर्वांकडून वदवून घेतली, जि. प. च्या सी. ओ. भुवनेश्वरी यांनी मुलीनं मध्ये मिसळून त्यांना छोट्या गोष्टी द्वारे चांगले कार्य सतत करावे, अभ्यास करून मोठे प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, डॉक्टर होण्यासाठी प्रेरणा दिली, बालविवाह प्रतिबंध करावे असे सांगून प्रशासन सतत मदत साठी तयार आहे असे अभिवचन दिले, सूत्रसंचालन करणार सौ. ज्योशना पवार यांनी गर्भातील स्त्री भ्रूण चे स्वलिखित मनोगत सादर करून स्त्री भ्रूण हत्या थांबवणे गरजेचे आहे हे सांगितले,सौ. चंद्रकला सिसोदिया यांनी प्रास्ताविक करतांना सर्वांचे स्वागत करून कार्यक्रम चे उद्दिष्ट सांगितले कोमल हॆ तू कमजोर नही, शक्ती का नाम नारी हे अश्या प्रकारचे प्रेरक व स्फूर्ती दायक रचना एकावून मुलींना त्यांच्या अंतर्गत असलेल्या शक्तीची जाणीव करून दिली,सौ. शुभा पाध्ये फरांदे यांनी पंतप्रधान मोदी साहेब यांच्या प्रेरणे सुरु झालेल्या बेटी बचाव बेटी पढाव अभियान ची माहिती देऊन त्याची गरज अधोरेखित केली व अश्या भव्य कार्यक्रम बद्दल समाधान व्यक्त केले,सूत्रसंचालक श्री भिमलिंग लिंभारे यांनी मुलीच्या वडिलांच्या भावना कवितेत सांगितल्या, याठिकाणी आलेल्या सर्व मुलींना प्रमाणपत्र देण्यात आले, सर्वाना पाणी, बिस्कीट देण्यात आले, आभार प्रदर्शन भिमलिंग लिंभारे यांनी केले, कार्यक्रम च्या शेवटी राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपन्न झाला, कार्यक्रम यशस्वी होणेसाठी  बेटी बचाव बेटी पढाव चे धुळे ग्रामीण संयोजिका सौ. चंद्रकला सिसोदिया, दोंडाईचा शहर संयोजक श्री भिमलिंग लिंभारे, कार्यकारणी सदस्या सौ. मयुरा पारख, सौ. जोशना पवार, सौ. रोहिणी लिंभारे, सौ. प्रेरणा सोलंकी यांनी मेहनत घेतली

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने