शिरपूर : तालुक्यातील आंबे गावात विश्व मानव रुहाणी केंद्र नवानगर शाखा दहिवद तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीरात २२३ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
आंबे गावात ४ डिसेंबर २०२२ रोजी शिबीरात २२३ रुग्णांची अनुभवी डॉक्टरांकडून तपासणी करुन त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार मोफत औषधी देण्यात आली. या प्रसंगी संरपच सौ. मिनाक्षी प्रितम पावरा, प्रितम गेदराम पावरा, ग्रामसेवक विलास भिका भोई, उपसरपंच सोनबाई शिवाजी, दिनेश गोपीचंद, सखाराम गेदराम पावरा, कृष्णा गेदराम पावरा, सरदास हरदास पावरा उपस्थित राहून त्यांनी पूर्णपणे सहकार्य केले.
या वेळी डॉ. सुनिल सी. पावरा, डॉ. रोहन व्ही. गुजराथी, डॉ. बन्सीलाल पी. पावरा, डॉ. प्रशिक सोमा वाघ, डॉ. शितल एस. महाजन, लक्ष्मण आर. पावरा यांनी आरोग्य निदान करुन औषध वितरण केले.
विश्व मानव रुहाणी केंद्र (नोंदणीकृत) एक संपूर्ण लाभकारी, परोपकारी आणि अध्यात्मिक संस्था आहे. ही संस्था संत बलजित सिहं यांनी शिकवलेले नैतिक जीवन, अध्यात्म व ध्यानधारणा यावर आधारीत कार्यक्रम आणि लोककल्याण साठी विविध प्रकारच्या सामाजिक कार्याचे सातत्याने आयोजन करते.
Tags
news
