आरोग्याचे शिवधनुष्य मी पेलू शकलो,ते राज्यातील रुग्णसेवकांच्या कठोर परिश्रमामुळेच.....कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे पत्रकार रणवीरसिंह राजपूत,ठाणे




मुंबई,दि.१ डिसेंबर :- *रुग्ण सेवा हीच खरी ईश्वरसेवा* हे ब्रीद आत्मसात करून राज्यातील रुग्णसेवक हे तनमनधनाने गोरगरिबांची आरोग्य सेवा करत आहेत,ही शिवरायांच्या महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे,असे गौरवोद्गार कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी येथे काढले.शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदारसाहेब बोलत होते.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उभारण्याचे श्रेय खऱ्या अर्थाने मंगेश चिवटे अन् त्यांच्या टीमला जाते,असे डॉ.शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.चिवटे यांची रुग्णसेवा करण्याची चिकाटी अन् तळमळीमुळे गेल्या पाच वर्षात राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये आरोग्य सेवा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचली,याचा मला सार्थ अभिमान आहे,असे श्रीकांतदादांनी सांगितले.

या मदत कक्षांना अन् तेथे
कार्यरत असलेल्या  रुग्णसेवकांना आम्ही पैसे देत नाहीत,तर ते स्वयंस्फुर्तीने रुग्णसेवा करत असतात,असे  डॉ.श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.काही रुग्णसेवकांनी आपल्या घरात तर,एकाने आपल्या पानटपरीत मदत कक्ष सुरू केले,याचे कौतुक वाटते.यामागे खरा *ड्रायव्हिंग फोर्स* मंगेश चिवटे यांचा असून,त्याने पत्रकारिता सोडून सदर मदत कक्षाची संकल्पना मांडली.खऱ्या अर्थाने राज्यात रुग्णसेवेचा प्रवास घडवला तो मंगेशने,या शब्दात श्रीकांतदादांनी त्यांची प्रशंसा केली.
आपण जर  लहान मुलांच्या हृदयाच्या छिद्राचे ऑपरेशन करण्याची मोहीम राज्यात अधिक जोमाने राबविली,तर येथील
बालमृत्यूचे प्रमाण निश्चितच घटेल,असा विश्वास खासदार साहेबांनी यावेळी व्यक्त केला.
आरोग्यावरील बजेटमधील तरतूद वाढविली पाहिजे तसेच किफायतशीर दरात लहान मुलांच्या
शस्त्रक्रिया होणे अत्यंत गरजेचं आहे,असे श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले.या पार्श्वभूमीवर कळवा हॉस्पिटलमध्ये *कॅशलेस काउंटर* उघडल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.

गोरगरीबांना 
शस्त्रक्रिया करण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे,याचे मला मनस्वी समाधान वाटते,असे श्रीकांतदादांनी यावेळी म्हटले.*माता सुरक्षित तर घर सुरक्षित* या योजनेखाली राज्यातील सुमारे चार कोटी मातांची आरोग्य तपासणी झाल्याची माहिती डॉक्टरसाहेबांनी याप्रसंगी दिली.

मदत कक्षाकडून केलेल्या एका फोनने रुग्णाच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडते,ही गोष्ट अतुलनीय अन् प्रशंसनीय आहे,असे ते म्हणाले.मदत कक्षाच्या माध्यमातून दिली जाणारी मोफत रुग्णसेवा ही वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना निश्चितच पथदर्शक ठरेल,यात शंका नाही,असा निर्वाळा डॉ.श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने