शिरपूर - महाराष्ट्र शासनाच्या कायाकल्प पुरस्कार मोहिमे अंतर्गत सन 2021 -2022 या वर्षासाठी प्रा.आ.केंद्र रोहिणि ता.शिरपूर या रुग्णालयाला धुळे जिल्ह्य़ात प्रथम मानांकन आणि दोन लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
दि.12/12/2022 रोजी आयुक्त आरोग्य सेवा तथा कमिशनर राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.
प्रा.आ.केंद्र रोहिणि हे दुर्गम भागातील आदिवासीबहुल भागातील आरोग्य संस्था आहे.एकुण साठ हजार लोकसंख्येचे कार्यक्षेत्र असलेले आरोग्य केंद्र असुन एकुण आठ उपकेंद्र संस्थे अंतर्गत कार्यरत आहेत.
धुळे जिल्ह्य़ातील 41 प्रा.आ.केंद्रातुन रोहिणिला प्रथम क्रमांक मिळाला आहे. धुळे जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार व जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.संतोषजी नवले यांच्या पुढाकाराने व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.राजेंद्र बागुल आणि डॉ.प्रसन्न कुलकर्णि यांच्या मोलाच्या सहकार्याने व प्रा.आ.केंद्र रोहिणिच्या सर्व कर्मचारीवृंद यांच्या मदतीतून रुग्णालयाचा कायापालट करण्याचा प्रयत्न सुरु आहे व आज मिळालेला पुरस्कारहे त्याचेच फलित आहे असे रोहिणिचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.राष्ट्रपाल अहिरे यांनी दिली . रुग्णालयात 24×7 आरोग्य सेवा सुविधा दिल्या जात आहेत. शासनाच्या आरोग्य विभागाच्या पथकाकडून चार महिन्यांपूर्वी मूल्यांकन झाले होते.यात रुग्णालयातील प्रसस्थ प्रसूतिगृह,संस्थेत झालेल्या 220 कुटुंब कल्याण स्त्रि शस्त्रक्रिया तसेच रुग्णालयातील स्वच्छता, इमारत रचना, पायाभूत सुविधा,चोविसतास पिण्याचे शुध्द व थंड पाणि तसेच रुग्णांसाठी गरम पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय यंत्रणा व सुविधा, आणि शासकीय आरोग्य योजना व मोहिमा यांची यशस्वी अंमलबजावणी व अन्य सुविधा, रुग्णांचा प्रतिसाद, कर्मचारी प्रशिक्षण,तांत्रिक ज्ञान आणि रुग्णांशी कर्मचारीवर्ग यांची आपुलकीची वागणुक आदी विविध बाबींची पाहणी केली होती. या मूल्यांकनातून प्रा.आ.केंद्र रोहिणिस जिल्ह्य़ातुन प्रथम मानांकन देण्यात आले आहेत.
जिल्ह्य़ाचे जिल्हा आरोग्यअधिकारी डाॅ.संतोष नवले यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डाॅ.राष्ट्रपाल अहिरे ,डाॅ.प्रितम माळी ,डाॅ.सुनिल पावरा,डाॅ.विशाल पाटिल आणि सर्व कर्मचारी यांच्या सहभागातून हे यश मिळाले आहे. येत्या वर्षात राज्यस्तरावर मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न असणार आहे,अशी खात्री डाॅ.राष्ट्रपाल अहिरे यांनी दिली.
उपलब्ध सोयी सुविधांचा लाभ रुग्णांनी घ्यावा. मोफत सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व त्यांची टिम चोविस तास उपलब्ध आहेत.
सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या एचएलएल मार्फत मोफत केल्या जातात. महिलांच्या प्रसूतीसाठी स्वतंत्र प्रसूतिगृह उपलब्ध आहे.
कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया येथे मोफत केली जात आहेत. या सर्व सुविधांचा लाभ कार्यक्षेत्रातातील रुग्णांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कोविडच्या काळात तात्पुरते अलिगिकरण कक्ष येथे निर्माण करण्यात आले होते व प्रतिबंधक सुविधां येथे दिल्या जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.
प्रा.आ.केंद्र रोहिणिस कायाकल्प प्रथम पुरस्कार बद्दल मा.आमदार सो श्री काशीरामदादा पावरा व श्री कैलासभाऊ पावरा समाज कल्याण सभापती जिप धुळे यांनी प्रा.आ.केंद्रात येवुन सर्व कर्मचारीवर्ग यांचे अभिनंदन केले आहे.
