मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाची पुनर्निर्मिती

 


✍️पत्रकार रणवीरसिंह राजपूत,ठाणेरा

मुंबई - राज्यातील गोरगरीब,निराधार लोकांना त्यांच्या महागड्या शस्त्रक्रियांसाठी वेळीच अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याकरिता शिंदे-फडणवीस सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाची पुनर्निर्मिती केली आहे.सदर कक्ष मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडले होते.  ते कक्ष आता गेल्या पांच महिन्यापासून श्री.मंगेश चिवटेसर यांच्या अथक प्रयत्नांतून पुनर्जीवित झालं आहे.


या पांच महिन्यात सुमारे १६०० रुग्णांचे यशस्वी ऑपरेशन होऊन त्यांना एकूण ११ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून चिवटेसरांनी मिळवून दिलं आहे.


याबद्दल संबंधित रुग्णांनी अन् त्यांच्या कुटुंबियांनी मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे,मा.उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस,खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे आणि सदर कक्षाचे प्रमुख श्री.मंगेश चिवटेसर यांचे शतश: आभार मानले आहे.


बंधू भगिनींनो,या योजनेचा लाभ जर आपणास घ्यावयाचा असेल तर,खालीलप्रमाणे आपणास कागदपत्रे सादर करावे लागतील,याची खबरदारी घ्यावी.


शिंदे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असल्याने त्यांचा *रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा* या पवित्र ब्रीदशी प्रामाणिक राहून सर्वधर्मीय लोकांच्या जीवांचे रक्षण करण्याचा मानस आहे.या पार्श्वभूमीवरच राज्यातील लोक मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांना *अनाथांचे नाथ एकनाथ* असे संबोधित असतात.जय🚩महाराष्ट्र!


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने