शिरपूर : शिरपूर एज्युकेशन सोसायटी व आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट तर्फे १९ डिसेंबर २०२२ रोजी मम्मीजी हेमंतबेन रसिकलाल पटेल क्रीडा महोत्सव-२०२२ आयोजित करण्यात आला आहे.
आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाच्या प्राथमिक विभागातील उदयोन्मुख चिमुकल्या खेळाडूंना प्रेरणा मिळण्यासाठी मम्मीजी हेमंतबेन रसिकलाल पटेल यांच्या जयंती निमित्त १९ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजता उद्घाटन तसेच बक्षीस वितरण दुपारी ४ वाजता आर. सी. पटेल मेन बिल्डींग येथे शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त चिंतनभाई अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार आबा महाजन राहतील. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, विश्वस्त ॲड. सी. बी. अग्रवाल, विश्वस्त बबनलाल अग्रवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, गटशिक्षणाधिकारी एफ. के. गायकवाड, शिरपूर पीपल्स बँक तज्ञ संचालक कमलकिशोर भंडारी, श्री बालाजी संस्थान उपाध्यक्ष गोपाल भंडारी, शिरपूर पीपल्स बँक चेअरमन योगेश भंडारी, संस्था क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल, सामाजिक कार्यकर्ते फिरोज खाँ काझी, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा व अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाचे सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.
