खान्देश वारकरी सेवा मंडळ धुळे तर्फे जेष्ठ वारकरी पुरस्कार प्रदान सोहळा आंनदोत्सवात संपन्न*



 धुळे— खान्देश वारकरी सेवा मंडळ धुळेतर्फे आयोजीत वै.ह.भ.प.विठ्ठलबाबा चौधरी(मोठेबाबा)यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने हरिनाम संकिर्तन सप्ताह व वारकरी पुरस्कार  सोहळा(वर्षे१९वे) दि.१८डिसेंबर २०२२ रोजी संध्या.६ वा.नकाणे रोड एकविरा नगर येथे खान्देश रत्न गुरुवर्य ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडी, खान्देश वारकरी रत्न वैराग्यमुर्ती तुकाराम बाबा जेऊरकर,सन्मानमुर्ती वारकरी रत्न ह.भ.प.ज्ञानमुर्ती परमेश्वर महाराज जायभाये, सन्मानमुर्ती वारकरी भुषण ह.भ.प.सेवामुर्ती भिलाजी बापु शिंदे व धुळे जिल्हा,परिसरातील गायक,वादक व हरीभक्त जेष्ठ वारकरी भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आले प्रमुख अतिथी  धुळे महानगरपालिका महापौर नानासाहेब प्रदीप कर्पे,शिवसेना जिल्हा अध्यक्ष आण्णासो.हिलाल माळी भागवतकार प्रमोद भोंगे महाराज ,किर्तनकार ह.भ.प.चंद्रकांत महाराज,शि.व.न.पा.माजी नगरसेवक माळी संतोष महारु त्यात शिरपुर तालुक्यातुन जेष्ठ वारकरी पुरस्काराचे मानकरी  *ह.भ.प.विठोबा शेनपडु महाजन उंटावदकर*, *ह.भ.प.नानाभाऊ विश्वास पाटील जुने भामपुरकर*,*ह.भ.प.हनुमंत भिका पाटील जवखेडाकर*,*ह.भ.प.विश्वास सिताराम पाटील वाघाडीकर*,*ह.भ.प.सुदाम आना ईशी वरुळकर*,*ह.भ.प.सुरेश धनसिंग पाटील तोंदेकर*,*ह.भ.प. मनोहर सिताराम पाटील वनावलकर* या सर्व वारकरींना  जेष्ठ  वारकरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले या सर्व पुरस्कारार्थींना शिरपुर तालुका वारकरी,टाळकरी भजनी मंडळी,वैष्णवी एकतारी,आध्यात्मिक संघटनातर्फे फार फार अभिनंदन ,जय हरी,जय रामकृष्ण हरी                              आयोजक— खान्देश वारकरी सेवा मंडळ धुळे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने