शिरपूर : विश्व मानव रुहाणी केंद्र शाखा दहिवद तर्फे सुळे गावात मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.
या संदर्भात दि. २७ नोव्हेंबर २०२२ रविवार रोजी विश्व मानव रुहाणी केंद्र नवानगर शाखा दहिवद ता. शिरपूर जि. धुळे यांच्या वतीने सुळे ता. शिरपूर या गावात मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. शिबीरात १५३ रुग्णांची अनुभवी डॉक्टरांकडून तपासणी करुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत औषधी देण्यात आली.
या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच रवींद्र काशिराम पावरा, उपसरपंच राकेश भिल, ग्रामसेवक बी. जी. सोनवणे, पोलीस पाटील सिताराम राजाराम पावरा, देवराम काळु, माजी सरपंच सुरेंद्रसिग राजपूत, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
या कामी डॉ. विनोद राजेश पावरा, डॉ. सुनिल पावरा, डॉ. सुभाष पावरा, डॉ. प्रशिक वाघ, डॉ. शितल महाजन, फार्मासिस्ट सरिता जमादार, सहकारी यांनी आरोग्य निदान व औषध वितरण केले. तसेच गावातील स्थानिक कार्यकर्ते व चॅरिटी टीम सदस्य यांनी परिश्रम घेतले.
विश्व मानव रुहाणी केंद्र ही (नोंदणीकृत) एक संपूर्ण लाभकारी, परोपकारी आणि अध्यात्मिक संस्था आहे. ही संस्था संत बलजितसिंहजी यांनी शिकवलेले नैतिक जीवन, अध्यात्म आणि ध्यानधारणा यावर आधारित कार्यक्रम आणि लोक कल्याणासाठी विविध प्रकारच्या समाजिक कार्याचे आयोजन करते. जागतिक महामारी कोविड-१९ च्या काळातही विविध राज्यामध्ये संस्थेतर्फे धर्मदाय कार्य पूर्ण उर्जा व उत्साहाने करण्यात आले.
.jpg)