शिरपूर : आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाच्या अॅम्बिशन अॅथेलेटिक्स मीट 2022- 23 शिरपूर क्रीडा स्पर्धा दि. 29 व 30 नोव्हेंबर रोजी शिरपूर क्लस्टर या मैदानी स्पर्धा संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर संपन्न झाल्या.
गेल्या अनेक वर्षांपासून भाईंच्या मार्गदर्शनाखाली आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाच्या खेळाडू ंसाठी सातत्याने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येऊन राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील उत्तम खेळाडू निर्माण होण्यासाठी नेहमी प्रयत्न केले जातात.
स्पर्धांचे उद्घाटन श्री बालाजी संस्थान उपाध्यक्ष गोपाल भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा होते. यावेळी प्रमुख अतिथी फिरोज काजी, जाकीर शेख, प्राचार्य पी.व्ही.पाटील, प्राचार्य आर.बी. पाटील, प्राचार्य आर.एफ.शिरसाठ, प्राचार्य पी. डी. पावरा, प्राचार्य निश्चल नायर, प्राचार्या स्मिता पंचभाई, प्राचार्य अमोल परब व अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक पर्यवेक्षक एन. ई. चौधरी यांनी केले. सूत्रसंचलन सुजीत जाधव यांनी केले. आभार मनोज पाटील यांनी मानले. शिरपूर क्लस्टर मध्ये सहभागी शाळा : आर. सी. पटेल मराठी माध्यमिक विद्यालय, आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल , मुकेश आर. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल, आर. सी. पटेल उर्दू माध्यमिक विद्यालय, आर. सी. पटेल माध्यमिक आश्रमशाळा निमझरी, आर. सी. पटेल प्राथमिक शाळा क्रांतीनगर, आर. सी. पटेल प्राथमिक शाळा सुभाष कॉलनी, आर. सी. पटेल प्राथमिक आश्रमशाळा निमझरी, आर. सी. पटेल प्राथमिक शाळा वरवाडे या शाळांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला.
स्पर्धा १४ वर्षे, १७ वर्षे व १९ वर्षे या तीन वयोगटात घेण्यात आली. धावणे १०० मी., २०० मी., ४०० मी., ८०० मी., १५०० मी. ५ कि. मी. ,४ बाय १०० रीले, लांब उडी, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक इ. मैदानी खेळांचा समावेश होता. गोल्ड ७८, सिल्व्हर ७८, ब्रांझ ७८ असे एकूण २३४ मेडल्स विजयी खेळाडूंना प्रदान करण्यात आले. मैदानी स्पर्धा सामना अधिकारी म्हणून स्वप्निल मोरे, मोनिका पावरा, दिनेश वसावे, अनिल पावरा, सागर माळी, हरीश सोनवणे, घनशाम पाटील, शफीक मोहम्मद, चेतन माळी, अयाज अहमद, रुपेश सुर्यवंशी, अनिकेत मोरे, जयसिंग पाडवी, करण शिंदे, प्रशांत ढोले, श्रीकांत चव्हाण, भूषण कोळी, विपूल ईशी, अशोक माने यांनी काम पाहिले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी समन्वयक डॉ.विनय पवार, राहुल स्वर्गे, संदीप देशमुख, पूजा जैन, निकिता पाटील, एम.व्ही पावरा, बी. जे. गायकवाड, सुशिल पाटील, व्ही. ई. सिसोदे, दुष्यंत पाटील, बी. डी. पाटील, मोहसीन कुरेशी, तुषार माळी, तुषार गुजराथी, डी पाटील यांनी प्रयत्न केले.
