धुळे लोकसभा संयोजकपदी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांची नियुक्ती जाहिर




 शिरपूर : भारतीय जनता पार्टीने राज्यस्तरीय लोकसभा प्रवास योजना कार्यक्रम केंद्रीय योजने प्रमाणेच महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघामध्ये राज्यस्तरीय योजना निश्चित केली आहे. या लोकसभा मतदार संघांमध्ये पक्षाच्या विजयासाठी संघटना मजबूत करणे आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावितपणे राबविणे हे उद्दिष्ट आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांची धुळे लोकसभा मतदार संघ संयोजकपदी नियुक्ती जाहिर केली आहे. बबनराव चौधरी यांना या संदर्भात नियुक्ती पत्र नुकतेच प्राप्त झाले असुन नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, आपण ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडाल, असा विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य लोकसभा प्रवास योजनेचे प्रदेश संयोजक किशोर काळकर हे आहेत. तर लोकसभा प्रभारी म्हणुन केंद्रीय अर्थराज्यमंत्री ना. डॉ. भागवत कराड यांची हि नियुक्ती सोबत जाहिर केलेली आहे. बबनराव चौधरी यांचावर पक्षनेते नेहमीच वेगवेगळ्या विशेष जबाबदार्‍या सोपवत असतात. त्यांचावर गेल्या दोन वर्षापासुन उत्तर महाराष्ट्र बुथ रचना, मन की बात कार्यक्रम अश्या विशेष जबाबदार्‍या असुन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष पदावर हि ते कार्यरत असुन नंदुरबार जिल्हा प्रभारी हि आहेत. व आता हि नविन विशेष जबाबदारी सोपवुन पक्षनेत्यांनी  त्यांचावर विश्वास व्यक्त केला अहे. बबनराव चौधरी हे गेल्या बेचाळीस वर्षापासुन भाजपात सक्रीत आहेत त्यांनी आतापर्यंत शिरपूर विधानसभा सह विविध निवडणुका लढविल्या आहेत. त्यांचा नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने