ज्ञानोपासक शिक्षण मंडळी संचलित वाल्मीक ऋषी माध्यमिक विद्यालय तावखेडा (प्र. न.) ता. शिंदखेडा जि. धुळे येथे शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संकल्पनेतील व धुळे जि प च्या कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. व शिक्षण विभाग धुळे यांच्या मार्गदर्शनाने स्थलांतरित बालकांचे सर्वेक्षण करण्यासाठी डॉ. घनश्याम तानाजी अहिरे ( ग्रामविकास अधिकारी) यांनी विद्यालयास भेट दिली असता विद्यालयातील उपस्थिती व नाविन्यपूर्ण उपक्रम पाहून विद्यालयाच्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका श्रीम. पी.पी. महिरे -वाघ व विज्ञान शिक्षक श्री. एन.पी. भिलाणे यांचे अभिनंदन व कौतुक केले.
याप्रसंगी विद्यालयातील विज्ञान कोडे विजेते बालवैज्ञानिक कु. अंकिता नरेंद्रसिंग गिरासे व भूषण कोळी या विद्यार्थ्यांना अनुक्रमे कल्पना चावला व थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन असे नामकरण करून सन्मानित करताना अत्यानंद व्यक्त केला.
अशा प्रकारचे विज्ञान कोडे विजेत्या विद्यार्थ्यांना अर्थात बालविज्ञानिकांना संपूर्ण दिवसभरासाठी शास्त्रज्ञांची नावे देऊन सन्मान करून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी , गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठीचे प्रयत्न पाहून गौरवपूर्ण उद्गगार आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
याप्रसंगी उपस्थित असलेले ग्रामसेवक श्री. चौधरी यांचा सन्मान विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. सी.झेड. कुवर व उपक्रमशील शिक्षक श्री ए.के. सावंत यांनी केला. उपक्रमशील शिक्षिका श्रीम. मंगलाताई डी .कुवर, श्री. पी.एच. लांडगे ,श्री नितीन पाटील यांची उपस्थिती प्रमुख पाहुणे म्हणून लाभली होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. जितेंद्र राजपूत व श्री चुडामन नाना धनगर यांनी मेहनत घेतली.
