केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र शासनातर्फे शिरपूर तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी 35 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांच्या अथक प्रयत्नाना यश




शिरपूर : माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांच्या अथक प्रयत्नाने तसेच पाठपुराव्यामुळे केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी केंद्र शासनातर्फे रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली च्या वतीने शिरपूर तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी एकूण 35 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे.


केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि परिवहन मंत्री ना. नितिन गडकरी यांच्याशी महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल हे सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी (CRIF) मधून शिरपूर तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी 35 कोटी रुपयांचा निधी 12 डिसेंबर 2022 रोजी मंजूर करण्यात आला आहे.


माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी पत्रव्यवहार करून केलेल्या मागणीनुसार सावळदे (एन. एच.-52) ते शिरपूर एम डी आर - 7 किमी 0/00 ते 6/800 ता. शिरपूर, जिल्हा-धुळे पर्यंत 6.8 कि. मी. लांबीच्या काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी 25 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. तसेच शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी पत्रव्यवहार करून केलेल्या मागणीनुसार बोराडी ते सांगवी रोड एस एच -1 कि. मी. 87/00 ते 97/00 (बोराडी ते सांगवी) ता. शिरपूर जि. धुळे या 10 कि. मी. लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्ती साठी 10 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे.


केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्याशी महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल हे सातत्याने पाठपुरावा करत होते. या नुसार सदर रस्त्यांचे चित्र बदलणार असून नागरिकांनी आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांचे मनापासून आभार मानले आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने