शिरपूर : नाबार्ड-28 अंतर्गत माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांच्या प्रयत्नाने शिरपूर तालुक्यातील एक रस्ता व दोन पुलांसाठी एकूण 15 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला असून विविध विकास कामांसाठी सातत्याने शासनाच्या वतीने निधी आणल्याबद्दल जनतेने आनंद व्यक्त केला आहे.
नाबार्ड-28 अंतर्गत शिरपूर तालुक्यातील सावळदे-उंटावद-शिरपूर रस्ता काँक्रिट करणे कामी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच जातोडे-वनावल-चांदपुरी-अर्थे कोराडी नदीवर पुलाचे बांधकाम करण्यासाठी 3 कोटी रुपये तर बोराडी, न्यू बोराडी, उमर्दा, वकवाड रोडवर पूल बांधणेसाठी 2 कोटी रुपये असा एकूण पंधरा कोटी रुपयांच्या भरघोस निधी मंजूर झाला आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा हे सातत्याने पाठपुरावा करत होते. या नुसार सदर रस्त्यांचे चित्र बदलणार असून नागरिकांनी आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांचे मनापासून आभार मानले आहेत.
