विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक विषयाची आवड निर्माण करण्यासाठी कृतिशील शिक्षणाची जोड हवी - राजगोपाल भंडारी,

 



भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (आयसर) पुणे व शिरपूर एज्युकेशन सोसायटी यांच्या तर्फे  विज्ञान व गणित विषयाच्या शिक्षकांसाठी आय-राइज प्रशिक्षण

शिरपूर : विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक विषयाची आवड निर्माण करण्यासाठी कृतिशील शिक्षणाची जोड हवी. विद्यार्थ्यांना शिक्षकांनी सातत्याने कृतिशील अध्यापनातून घडविण्यासाठी प्रयत्न करावे. आयसर, पुणे मार्फत तसेच शासनाच्या अनेक शैक्षणिक सुविधांचा सर्व शिक्षकांनी लाभ घ्यावा. शिक्षकांनी नेहमी अद्ययावत व उपक्रमशील राहून आनंददयी अध्यापनासाठी प्रयत्नशील असावे. शिक्षकांनी आपले ज्ञान अद्यावत ठेवणे गरजेचे आहे. माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी व शिक्षकांसाठी अत्याधुनिक शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. या सुविधांचा देखील सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी केले.

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (आयसर) पुणे व शिरपूर एज्युकेशन सोसायटी यांच्या तर्फे शिरपूर शहरातील आर. सी. पटेल मेन बिल्डिंग मधील "राजगोपाल भंडारी हॉल" मध्ये विज्ञान व गणित विषयाच्या शिक्षकांसाठी आय-राइज प्रशिक्षण कार्यक्रम 14 डिसेंबर 2022 पासून सुरू झाला. सदर कार्यशाळेचे उदघाटन संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या हस्ते तसेच संस्थेचे सचिव प्रभाकरराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रोजी झाले.

सदर कार्यशाळेत एकूण 140 शिक्षक व आयसर पुणे येथून आलेले 3 मार्गदर्शक व आयसर पुणे येथून प्रशिक्षित 12 शिक्षक हे मार्गदर्शन करत आहेत.

आजच्या धकाधकीच्या व स्पर्धेच्या युगात विज्ञानाने मोठ्या प्रमाणावर संशोधन करून आपल्या देशाला प्रगतीपथावर नेले आहे. मात्र आजही काही ठिकाणी विज्ञान हा विषय बंदिस्त खोलीतच शिकविला जातो. विज्ञान व गणित विषयाला कृतीची जोड दिल्यास निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जागरूकता व गणितीय संकल्पना वाढीस लागेल. या उद्देशाने भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (आयसर) पुणे व शिरपूर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने  विज्ञान व गणित विषयाच्या शिक्षकांसाठी आय-राइज या प्रशिक्षणाचे दि. 14 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीत आयोजन संस्थेच्या "राजगोपाल भंडारी हॉल" मध्ये आयोजित करण्यात आले.

आयसर प्रशिक्षण समन्वयक श्रीमती जहीदा शेख यांनी प्रास्तविकपर भाषणात सांगितले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक आणि सृजनशील विचार निर्माण करणे, नवनवीन गोष्टींचा शोध घेणे आणि प्रयोग करणे व उपक्रमातून कृतीयुक्त शिक्षण पद्धती नुसार अध्यापन हे या प्रशिक्षणाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. वरील सर्व घटकांविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन  केले.

कार्यक्रमासाठी संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य पी. व्ही. पाटील, प्राचार्य आर. बी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. 
सूत्रसंचालन एन. ई. चौधरी यांनी केले. आभार प्राचार्य पी. व्ही. पाटील यांनी मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने