शिंगावे येथील 44 वर्षीय युवक बेपत्ता




शिरपूर प्रतिनिधी - तालुक्यातील शिंगावे येथील 44 वर्षे युवक बेपत्ता झाला असून शहर पोलीस ठाण्यात मिसिंग नोंद करण्यात आले आहे.
 मनोज शालिक कोळी वय 44 राहणार शिंगावे तालुका शिरपूर जिल्हा धुळे असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी बेपत्ता झालेल्या युवकाच्या पत्नीने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार मनोज कोळी हे ११ डिसेंबर 2022 रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरातून कोणासही काही न सांगता कुठेतरी निघून गेले सायंकाळी व रात्री घरी परत न आल्याने त्यांच्या सर्वत्र नातेवाईकांनी शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत त्यामुळे सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे .याप्रकरणी सदर युवक बेपत्ता झाल्याची नोंद शिरपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल मनोज पाटील करत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने