कमरावद येथे एकास मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे




शहादा तालुक्यातील कमरावद येथे पोलीस, जिल्हाधिकारी व वनक्षेत्रपाल यांच्याकडे तक्रारी अर्ज केल्याच्या कारणावरून एकास घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहादा तालुक्यातील कमरावद येथील ब्रिजलाल कृष्णा कोळी यांनी पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी व शहादा वनक्षेत्रपाल यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला. या कारणावरून कृष्णा कोळी यांच्या घरात विकास शांताराम कोळी, दीपक शांताराम कोळी, भटू शांताराम कोळी, भैय्या राजाराम कोळी, शांताराम शंकर कोळी, राजाराम शंकर कोळी, कविता भटू कोळी, व ताईबाई नामदेव कोळी यांनी अनधिकृतपणे प्रवेश केला. तसेच विकास कोळी व दीपक कोळी यांनी कृष्णा कोळी यांना काठी व हाताबुक्यांनी मारहाण केली. इतरांनी शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत कृष्णा कोळी यांच्या

फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात आठ जणांविरूध्द भादंवि कलम १४३, १४७, ४५२, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील करीत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने