तो मोबाईल टावर गावात नको दहिवद गावकऱ्यांची मागणी




शिरपूर प्रतिनिधी - दहिवद गावात उभारण्यात आलेला एअरटेल कंपनीच्या मोबाईल टावर सुरक्षा कारणास्तव गावापासून दूर हटवण्यात यावा यासाठी दहिवद ग्रामस्थांनी गावातील ग्रामसेवक व सरपंच यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.



यात गावकऱ्यांनी असे नमूद केले आहे की सदरच्या मोबाईल टावर हा रहिवासी वस्तीत उभा असून सदर टावर च्या बाबतीत सुरक्षा नियमांची कोणतीही काळजी घेतली जात नाही. त्यापासून घातक असे रेडिएशन च्या धोका असल्याने नागरिकांच्या जीवनात धोका निर्माण झाला आहे. सदरच्या टॉवरच्या बाबतीत देखरेख व स्वच्छता ची जबाबदारी नियमितपणे पार पाडली जात नसून टावर परिसरात गाण्याचे साम्राज्य वाढल्याने अनेक प्रकारचे गंभीर प्रकारचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. शिवाय सदर टॉवरला बसवण्यात आलेला जनरेटरच्या कर्कश आवाजाने ग्रामस्थ त्रस्त झाले असून सदरच्या मोबाईल टॉवर हा गावाबाहेर पाठवण्यात यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आले आहे. या निवेदनावर दहिवद ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य मयूर देवेंद्र पाटील पत्रकार गणेश दगा पाटील यासह इतर गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने