आर.सी.पटेल इंग्रजी माध्यमिक विद्यालयात बालदिवस संपन्न

          



शिरपूर (१४ सप्टेंबर) येथील आर.सी. पटेल इंग्रजी माध्यमिक विद्यालयात बालदिवस  साजरा करण्यात आला.बालदिनानिमित्त बचपन मेलाचे आयोजन करण्यात आले होते‌‌. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागतगीत विदयालयाच्या विद्यार्थिनी सादर केले. त्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदर प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. राजगोपाल भंडारी साहेब, स्कूल कमिटी चेअरमन श्री.योगेश भंडारी साहेब , संस्थेचे सी.ई.ओ श्री. डॉ.उमेश शर्मा साहेब विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल परब , प्राचार्या मनीषा मॅडम, प्राचार्या मधुबाला राही. उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी विद्यालयाच्या शिक्षकांनी  विनोदी नाटिका भोंदूगिरी बाबाचे जादूटोणा या नाटिकेच्या माध्यमातून हास्य विनोदी प्रसंग सादर केलेत. तसेच हास्यविनोदातून विद्यार्थ्यांच्या बालमनाला हास्याच्या कारंज्यातून विज्ञानाचा बोध नाटिकेच्या माध्यमातून देण्यात आला. तसेच विद्यालयाच्या शिक्षकांनी भारतातील पंधरा  राज्याचे फॅशन शो सादर केले. त्यात शिक्षकांनी अभिनय,नृत्य सादर केले



. विविध राज्याचे नृत्य, संस्कृतीचे दर्शन साकारले  कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण विद्यालयाच्या शिक्षकांच्या अभिनयातून तसेच नृत्यातून विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. सदर कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य डॉ‌.अमोल परब यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच बचपन  मेलाचे आयोजन करण्यात आले होते.  इयत्ता ५ ते ८ च्या १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.खाद्यपदार्थांचे फुडस्टॉल  पाणीपुरी, कचोरी, पोहा, खमंग, जलेबी, भेल, कॉफी, दाबेली, आईस्क्रीम इ. एकूण 13 फूड स्टॉल  लावण्यात आले होते. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी मनमुराद आनंद लुटला. तसेच विविध खेळांचे टॅटू, क्लोथ बॅग, मेहंदी, चेंडू फेक, बलून बूस्टर, टी-शर्ट पेंटिंग, थिंग्स अँड रिंग  आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन श्याम पाटील, पंकज बागुल, संदेश साळुंखे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक रवि सोनगिरे,शुभांगी पाटील यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन ललित सोनवणे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने