अहिल्यापुर गावातील वादग्रस्त पाईप मोरी बांधकामावर प्रशासनाच्या तोडगा नाही ग्रामस्थांच्या पुन्हा उपोषण आंदोलनाच्या इशारा



शिरपूर प्रतिनिधी -  शिरपूर तालुक्यातील अहिल्यापुर गावात स्मशानभूमी जवळ झालेल्या पाईप मोरीच्या कामाबाबत गावकऱ्यांनी आक्षेप नोंदवत अनेक प्रकारच्या तक्रारी यापूर्वीच शासन दरबारी केले आहे. गावकऱ्यांच्या आरोपानुसार सदरचे काम हे निकृष्ट दर्जाचे व नियमबाह्य असून त्यापासून या परिसरातील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मागील पावसाळ्यात या परिसरात या पाईप मोरीमुळे गाळ साचल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे व त्यामुळे वित्त आणि देखील झाली आहे. वारंवार तक्रार करून देखील शासनाने तक्रारीची दखल न घेतल्याने गावकऱ्यांनी आंदोलनाच्या पवित्रा घेतला होता त्यावेळेस सतत अकरा दिवस आंदोलन केल्यानंतर तालुक्याचे आमदार काशीरामजी पावरा जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार जी रंधे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत दोन महिन्याच्या आत आवश्यक तो तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते.



मात्र अद्याप या ठिकाणी आश्वासनाप्रमाणे पाईप मोरी काढून या ठिकाणी नवीन लहान पूलाची बांधणी करणेबाबत कोणतेही उपाययोजना किंवा कामकाज सुरू केलेले नाही. याबाबत प्रशासनाला विचारणा केली असता आता देखील टाळाटाळ केली जात आहे. पंचायत समिती प्रशासन असे म्हणते की आम्ही प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे. मात्र वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क केला असता आमच्याकडे असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही असे उत्तर मिळाल्याने गावकरी नाराज झाले असून त्यांनी ०१ डिसेंबर 2022 पासून या प्रश्नावर पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे.

दिनांक 16 रोजी धुळे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पंचायत समितीच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या समक्ष गटविकास अधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात आले असून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या देखील सदरच्या विषयी निदर्शनास आणून देण्यात आला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या विषयाबाबत अधिक माहिती घेऊन अधिकाऱ्यांशी विचारणा करून शासन नियमाप्रमाणे आवश्यक ती कारवाई तातडीने केली जाईल अशी आश्वासन गावकऱ्यांना दिले आहे.

मात्र गावकऱ्यांचे असे म्हणणे आहे की या ठिकाणी मुरूम जरी टाकण्यात आला असला तरी या मुरूममुळे शेतीमाल वाहून नेण्यास अडचण निर्माण होत असून अडकलेला ट्रॅक्टरला काढण्यासाठी इतर दोन ट्रॅक्टर ची मदत घ्यावी लागत आहे त्यामुळे एखादा अपघात होऊन दुर्घटना होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत या ठिकाणी नवीन पुलाचे निर्माण करावे अशी मागणी आंदोलन कारी व त्रस्त गावकऱ्यांनी केली आहे.
सदरच्या निवेदनावर चंद्रकांत गिरासे ,प्रशांत चौधरी ,संजय पाटील, संदीप राजपूत, राजपाल सिसोदिया ,डॉक्टर सरोज पाटील व ओंकार आबा जाधव इत्यादी लोकांनी सह्या केल्या आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने