वाल्मीक ऋषी विद्यालयात विज्ञान कोड्याचे उत्तर देणारी विद्यार्थिनी झाली थोर शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन





ज्ञानोपासक शिक्षण मंडळी संचलित वाल्मीक ऋषी माध्यमिक विद्यालय तावखेडा प्र‌‌‌ न येथे
विज्ञान कोड्याचे उत्तर देणारी बाल वैज्ञानिक कुमारी पूजा चंद्रशेखर कोळी या विद्यार्थिनीला थॉमस अल्वा एडिसन या नावाने विद्यालयाच्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका श्रीमती पी.पी. महिरे- वाघ व नवोपक्रमशील शिक्षक श्री एन. पी. भिलाने यांच्या शुभहस्ते संपूर्ण दिवसभरासाठी थॉमस अल्वा एडिसन असे नामकरण करून सन्मानित करण्यात आले. विज्ञान शिक्षक श्री एन के भिलाने यांनी  वैज्ञानिक माहिती विशद केली व विद्यार्थ्यांनी ती माहिती उपक्रम वहीत नोंद केली. याप्रसंगी विद्यालयाचे उप मुख्याध्यापक श्री एस. एस. पाटील, श्री ए.के .सावंत , श्रीम. एम.डी कुवर, श्री .पी. एच .लांडगे व नितीन पाटील यांची उपस्थिती प्रमुख पाहुणे म्हणून लाभली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ लिपिक श्री जे एन राजपूत, श्री दिलीप आबा पाटील ,श्री चुडामन धनगर यांनी मोलाचे सहकार्य केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने