जिल्हा नियोजनच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यासाठी 22 कोटींच्या कामांना मंजुरी - हर्षवर्धन पाटील प्रतिनिधी दत्ता पारेकर

 



पुणे:पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये 22 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे व निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली.


भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील  म्हणाले की, भाजप-बाळासाहेबांची शिवसेना गटाची महाराष्ट्र मध्ये सत्ता आल्यानंतर आपल्या इंदापूर तालुक्यासाठी विविध माध्यमातून आपण मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सातत्याने आपण निधीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने आज आपल्या इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये 22 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पुढील काळातही भाजप व बाळासाहेबांची शिवसेना सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी व विकास कामे इंदापूर तालुक्याला मिळणार आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने