दोडाईचा येथे नूतन महाविद्यालयात सायबर क्राईम संदर्भात मार्गदर्शन.* दोंडाईचा (अख्तर शाह)






 दोडाईचा  सायबर क्राईम मध्ये घरबसल्या चोरी करणे शक्य झाले आहे. ५ जी नेटवर्कमुळे प्रक्रियेत गतिमानता येणार आहे.घरफोडी,धाक दपडशा दाखवत, चेन स्नॅचींग या घटनापेक्षा आपल्या वैयक्तिक बॅंक खात्यावर असलेल्या पैशांची चोरी करणे शक्य झाले आहे.एटीएम वापर बाबत ज्ञानासह  जागरूकता नाही. WhatsApp  मध्ये  डाटा चोरी होण्याचे प्रमाण वाढले यासाठी वेगवेगळ्या आमीषे दाखवली जातात. याच्या पासून पासवर्ड नियमितपणे बदल, नियमितपणे वेब तपासणे मोबाईल वापरताना बाळगावी लागणारी सजगता,दक्षता याचे मार्गदर्शन केले.फीसींग, सवलत भेटवस्तू आदींच्या सहाय्याने फसवणूक केली जाते. असे एमकेसीलचे जिल्हा समन्वयक राहुल बाविस्कर यांनी नूतन माध्यमिक व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन करताना केले. प्राचार्य ए डी पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला  याप्रसंगी संस्थेचे संचालक अमित दादा पाटील यांनी मार्गदर्शन केले
 संस्थेचे संचालक अमित  पाटील , प्राचार्य ए डी पाटील,विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा डॉ. बी बी पाटील,  विजय बडगुजर प्रा एम एम चौधरी,प्रा नवनीत पवार,प्रा निलेश सैंदाणे प्रा राहुल पाटील ,प्रा ज्योती देसले,प्रा.मीनल बडगुजर,प्रा माधवी पाटील आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने