शिरपूर—शिरपुर वरवाडे नगरपरिषद तर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2023 चे औचित्य साधून शिरपुर वरवाडे नगर परिषद प्रशासक श्री. प्रमोद भामरे ,माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल , शि.व.न.पा. माजी नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल,शि.व.न.पा.माजी उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल,माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण शिरपुर वरवाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर साहेब,प्रशासकिय अध्यक्ष संजय हासवाणी, अभियंता माधवराव पाटील माजी नगरसेविका सौ.चंद्रकला संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्व्हेक्षण आत्म निर्भर वार्ड मोहिम वरवाडे वार्डनं.१३ संपुर्ण परिसर स्वच्छ कसा होईल या विषयी दि.२३/११/२०२२ रोजी सायं.५ वा.संत सावता माळी मंदीर वरवाडे येथे मिटींग आयोजीत करण्यात आली होती. त्यात स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत उदयान पर्यवेक्षक सागर कुलकर्णी यांनी सर्व जनतेस स्वच्छतेचे महत्व पटवुन दिले स्वच्छ सर्वेक्षण आरोग्य सहायक श्रीमती दिपाली साळुंखे यांनी कचरा विलगीकरणाचे महत्व पटवुन दिले व कचरा चार प्रकारचा वेगळा कसा करावा व वेगवेगळा घंटा गाडीत टाकावा या विषयी माहिती दिली. या कार्यक्रमात हेमंत माळीसर,आशा पवार मॅडम,युवराज माळीसर,प्रकाश देवरे यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले .जसे आपण आपले शरीर स्वच्छ ठेवतो त्या प्रमाणे आपण आपले घर,परिसर स्वच्छ ठेवण्याचा पुरेपुर प्रयत्न ठेवु शेवटी सर्व महिला पुरूषांनी स्वच्छते विषयी शपथ घेतली व घोषणा दिल्या . शिरपुर वरवाडे नगरपरिषदेच्या या उपक्रमांत आपला मौलाचा सहभाग नोंदवून आपला प्रभाग/वार्ड स्वच्छ व सुंदर राखण्यास सहकार्य कसे होईल यांच्या उपाय योजना करु या कार्यक्रमास संतोष महारु माळी यांचे विशेष सहकार्य लाभले. या प्रसंगी महादु माळी,बापु माळी,दौलत कोळी,श्याम पाटील,मोहन माळी,शांतीलाल माळी,रामलाल माळी,हिलाल माळी,बारकु माळी,आनंदा कोळी,जीवन माळी,नागो माळी,दिलीप बेलदार तसेच या सर्व स्वच्छ सर्वक्षेषणात आरोग्य विभाग प्रमुख अहिरे ,प्रज्ञशील निकम,मनोहर थोरात,श्रीजी इवेन्ट मॅनेजमेन्ट सदस्य सुषमा पवार,ज्योती चौधरी,ज्योती पाटील,संगिता आखाडे,सोनवणे विजय,रोशन माळी,मेहुल धाकड,मयुर धाकड व आशा वर्कर वैशाली बुवा,रुपाली बुवा यांचे सहकार्य लाभले बापु मास्तर यांनी आभार मानले.
Tags
news
